अहमदनगर प्रतिनिधी - निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरात पोहोचविण्याच्या प्र

अहमदनगर प्रतिनिधी – निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरात पोहोचविण्याच्या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळाल्याने आज पासून पुणे रोडवरील नेमाने इस्टेट मध्ये प्रेक्षकांच्या तुफान गर्दीत शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या प्रारंभ झाला यावेळी आमदार नीलेश लंके व राणीताई लंके यांनी उपास्तीतांचे स्वागत केले,यावेळी अनेक मान्यवरांसह हजारो प्रेक्षक उपस्थित होते ,छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास घराघरात पोहचविण्याचा प्रयत्न या महानाट्याच्या आयोजनाच्या मागे आहे .खा.अमोल कोल्हे यांच्या घोडयांवरील एन्ट्रीने लोकांनी शंभू राज्यांचा जयजयकार केला तर भव्य सेटअप,ध्वनीक्षेपन यंत्रणा, आकर्षक प्रकाश योजना यामुळे इतिहास डोळ्यासमोर घडत आहे असे वाटत होते. प्रतिष्ठानचे हजारो कार्यकर्ते स्वयंसेवकांचे काम करत असून वाहनतळ व इतर नियोजन,आतील बैठक व्यवस्था सुलभ असल्याने गडबड गोंधळ नव्हता,प्रेक्षक आपल्या पासप्रमाणे जागेवर बसले होते
COMMENTS