Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाठीत खंजीर खुपसण्याचे शिवाजीराव नाईक यांचे काम : राहुल महाडीक

इस्लामपूर / प्रतिनिधी : दिवंगत वनश्री नानासाहेब महाडीक हे सर्वसामान्य लोकांचे आधारस्तंभ होते. राजकारणात मदत करणार्‍याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे

पदाधिकार्‍यांचा कार्यकाल संपल्यानंतर मंत्री जयंत पाटील 5 वर्षाने इस्लामपूर पालिकेत
श्री सिध्दनाथ देवी जोगेश्‍वरी देवस्थानचा पारंपरिक शाही विवाह सोहळ्याचा शुभारंभ
फलटणमध्ये वाळू वाहतुक तस्करावरावर कारवाई; 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

इस्लामपूर / प्रतिनिधी : दिवंगत वनश्री नानासाहेब महाडीक हे सर्वसामान्य लोकांचे आधारस्तंभ होते. राजकारणात मदत करणार्‍याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम शिवाजीराव नाईक यांनी केले आहे. भविष्यात आ. मानसिंगराव नाईक यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम शिवाजीराव नाईक करणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील महाडीक गटाचे राजकिय समीकरणे वेगळी आहेत. याचा पेठ नाक्यावरील महाडीक गटाशी काहीही संबंध नसल्याचा भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष राहुल महाडीक यांनी सांगितले.
ते स्व. वनश्री नानासाहेब महाडीक पुतळा अनावरणच्या पत्रकार बैठकीत बोलत होते. या बैठकीस भाजप कार्य समितीचे सदस्य सम्राट महाडीक, महाडीक मल्टिस्टेटचे अध्यक्ष सतीश महाडीक यांची प्रमुख उपस्थिती होती.
राहुल महाडीक म्हणाले, कोरोनामळे या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण लांबणीवर पडले होते. नव्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी पुतळा उभा केला आहे. आम्ही शिक्षण संस्था , क्रेडिट सोसायटी, दूध संघाच्या मार्फत हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आम्ही आमच्या हिमतीवर संस्था उभ्या केल्या आहेत. कधीही कोणाच्या दारात आम्ही गेलो नाही. आमच्या सर्व संस्था चांगल्या प्रकारे सुरू आहेत. वनश्रींनी शिवाजीराव नाईक यांना 1999, 2004 च्या विधानसभा निवडणुकीत मदत केली आहे. सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपने मंत्री पदाची ऑफर दिल्याने नानांनी माघार घेत शिवाजीराव नाईक यांच्या पाठीशी उभे राहून निवडून आणले होते. मात्र, नाईक यांनी मदत करणार्‍याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे.
सम्राट महाडीक म्हणाले, कोरोनाचे नियम उठल्यानंतर वनश्री नानासाहेब महाडीक यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येत आहे. पुतळा अनावरण कार्यक्रमास भावनिक स्पर्श असणार आहे. वनश्री नानासाहेब यांच्या नावाने आम्ही संस्था उभ्या केल्या आहेत. या सर्व संस्था व्यवस्थित चालू आहेत. शिवाजीराव नाईक भाजप सोडून जाताना त्यांच्या अपयशाचे खापर आ. चंद्रकांत पाटील व आम्हा महाडिक बंधूवर फोडले आहे. संस्था उभ्या करायच्या तशाच चालवायच्या असतात. संस्थेमध्ये राजकारण आणायचे नसते. संस्था वेगळ्या व राजकारण वेगळे अशी पध्दत ठेवायला लागते. शिवाजीराव नाईक यांच्या संस्था उभा करताना वनश्री नानासाहेब महाडीक अग्रेसिव्ह होते. संस्था उभा राहिल्यानंतर चित्र वेगळे दिसले. त्यांनी उसाचे पैसे दिले नाहीत. यात महाडीक बंधूंचा संबंध येतो कुठे? जर यांच्याकडे 48 हजार कार्यकर्ते असते तर विधानसभा निवडणुकीत निवडून आले असते.
या बैठकीला माजी नगरसेवक कपिल ओसवाल, अमित ओसवाल, चेतन शिंदे, रितेश अग्रवाल, सुजित थोरात उपस्थित होते.

COMMENTS