Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेलापूर महाविद्यालयात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

बेलापूर प्रतिनिधी ः येथील बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात शिवराज्याभिषेक सोहळा अतिशय दर्जात्म

निळवंडे धरणाच्या पंचम सुधारीत प्रशासकीय मंजुरी
भ्रष्ट अधिकार्‍यांकडून पैसे घेऊन बोठेने दिली जरे हत्येची सुपारी? : रुणाल जरेचा दावा
पढेगावच्या शिंदे दाम्पत्याचे तीन तासाच्या अंतराने निधन

बेलापूर प्रतिनिधी ः येथील बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात शिवराज्याभिषेक सोहळा अतिशय दर्जात्मक अशा स्वरूपात संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सर्वांनी घ्यावा. हिंदवी स्वराज्याचे नवनिर्माण करताना छत्रपतींचे व्यवस्थापन, संघटन कुशलता, धाडस, संयम, करारीबाणा, निर्धार, निर्णयक्षमता, ज्येष्ठांचा आदर करणे असे सर्वच गूण विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत. या शिवराज्याभिषेक सोहळ्यात नेहा देवरे, वैष्णवी गाडे, अनिकेत काळे, माधवी मेहेत्रे, गौरी वाडकर, प्रतीक माळी, भगत अतुल, हर्षदा काळे, विकास राऊत, सागर व्यवहारे, तनुजा गाडे, प्रणया नागरे आदींनी आपापल्या भुमिका चोखपणे साकार केल्या तर वारी या कार्यक्रमात साक्षी भगत, पायल साळुंके, सीमा ओहोळ, सायली पुजारी, पुजा नवगीरे, ऋतुजा भगत,आरती टाकसाळ, दिव्या पुंड, गीता मेहेत्रे, आकांक्षा लोंढे यांनी वारीचे दृश्य हुबेहूब उभे केले.

सांस्कृतिक कार्यक्रमात लावणी, वारी, नृत्य, गीतगायन, तबलावादन, नाटिका आदि सादरीकरण बहारदार झाले.विद्यार्थ्यांनी सर्व सांस्कृतिक कार्यक्रमात उस्फूर्तपणे सहभाग घेतला. कार्यक्रम पाहण्यासाठी बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष व मविसचे चेअरमन राजेश खटोड, चंद्रशेखर डावरे,सहसचिव दीपक सिकची, रविंद्र खटोड, प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाले. सांस्कृतिक कार्यक्रमांची कोरिओग्राफी,सराव, वेशभूषा आणि दिग्दर्शन परीक्षित मोरे, मोरे यांनी केले .सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.स्वाती कोळेकर,प्रा. अमृता गायकवाड, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ.विठ्ठल सदाफुले यांनी केले तर प्रा.डॉ.अशोक माने,प्रा.सुनिता पठारे,प्रा.ओंकार मुळे, प्रा.डॉ. विठ्ठल लंगोटे, प्रा. डॉ.मनोज तेलोरे यांनी बॅकस्टेज सांभाळले. या कार्यक्रमासाठी बेलापूर पोलिस औट पोस्टचे आव्हाड, विद्यार्थी विकास मंडळाचे डॉ. संजय नवाळे तसेच महाविद्यालयाचे सर्वच प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी शिस्त ठेवण्याचे कामकाज केले. वार्षिक पारितोषिक वितरण  समारंभाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. बी. एन. पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, जेटीएस व एस आर के शिक्षण संकुलाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी परिश्रम करून घेतले.

COMMENTS