मुंबई/प्रतिनिधी : राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले असतांनाच, शिवसेनेवर जो
मुंबई/प्रतिनिधी : राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले असतांनाच, शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल चढवला, तर दुसरीकडे शिंदे गट शिवसेनेला न्यायालयीन लढाईत मात देण्यासाठी तयार झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या विभागप्रमुखांची मंगळवारी तातडीची बैठक घेतली. या बैठकीत कोणती चर्चा झाली, याचा तपशील समजू शकला नाही. मात्र एकंदरित भाजपच्या रणनीतीला कसे हाणून पाडायचे, याचबरोबर शिंदे गटाच्या कायदेशीर लढाईला मात करण्यासाठी चर्चा केल्याचे समजते.
एकिकडे मुंबई महापालिकेतील 150 जागांवर शिवसेनेचे नगरसेवक असणार असा निर्धार किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला होता. तर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी देखील 150 चे टार्गेट येथील पदाधिकारी आणि आमदारांना दिले आहे. एवढेच नाहीतर पुढचा महापौर हा भाजपचाच असावा अशा सूचना त्यांनी बैठकीत दिल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेतील कार्यकर्त्यांना दिलासा देत, त्यांच्यावर विश्वास टाकण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ही बैठक घेतली. शिवाय उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाने दिलेला वेळ कमी असल्यामुळे त्या दृष्टीने देखील शिवसेना पुढील रणनीती आखतांना दिसून येत आहे. खासदार अरविंद सावंत, सुनील राऊत, माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार भास्कर जाधव तसेच मुंबईतील विभागप्रमुख आणि महिला संघटक या बैठकीसाठी उपस्थित होते. तर शिवसेनेच्या नेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर भास्कर जाधव पहिल्यांदाज उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर आले आहेत. त्यामुळे आता भाजपला टक्कर देण्यासाठी शिवसेनेने देखील कंबर कसल्याचे दिसून येत आहे.
COMMENTS