Homeताज्या बातम्या

नागेश पाटील आष्टीकर यांच्या बंडखोरीमुळे शिवसैनिक पेटून उठले; प्रतिकात्मक पुतळा जाळून तीव्र निषेध

नांदेड : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून निवडून आल्यानंतर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी पक्षाशी बंडखोरी करत वेगळी भूमिका घेतल्याने ना

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नांदेड काँग्रेसचा विजय मार्च; ’लोकशाहीचा विजय’ असल्याचा दावा
“जास्तच खुमखुमी असेल तर पुढे या, एकदा होऊनच जाऊ द्या!” खा. नागेश पाटील आष्टीकर यांचे ठाकरे गटाला खुले आव्हान
धर्मेंद्र प्रधानांची भूमिका संवेदनशील; शेतकरी कर्जमुक्तीचा शब्दही सरकारने पाळला: खा. अशोकराव चव्हाण

नांदेड : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून निवडून आल्यानंतर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी पक्षाशी बंडखोरी करत वेगळी भूमिका घेतल्याने नांदेडमधील शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गुरुवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आष्टीकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत त्याचे दहन करून तीव्र निषेध व्यक्त केला.

यावेळी ‘गद्दारांचा निषेध असो’, ‘शिवसेना जिंदाबाद’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. पक्षाच्या चिन्हावर आणि शिवसैनिकांच्या विश्वासावर निवडून आलेल्या प्रतिनिधींनी स्वार्थासाठी पक्षाशी द्रोह केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. अशा प्रवृत्तीला शिवसैनिक कधीही माफ करणार नाहीत, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या आंदोलनात महानगरप्रमुख मनोज यादव, तालुकाप्रमुख सुनील कदम, मळकर, भैया शर्मा, डॉ. बालाजी पेनूरकर, लालचंद यादव, राजू यादव, नवनाथ जोगदंड, अशोक वाघमारे, अमजद लाला, परवेज खान, अंकुर पटेल, साईनाथ आलमखाने, करण ईटनकर, अशोक पावडे, किरण जाधव यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

COMMENTS