Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खासदार संजय राऊत यांच्या विरोधात शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक

  बीड प्रतिनिधी - ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधामध्ये बीड मधील शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक झालेत. बीड शहर पोलीस ठाण्याबाहेर जिल्हा

पदाच्या माध्यमातून युवकांना पाठबळ देण्याचे काम -विक्रम राठोड
जल जीवन योजने अंतर्गत मंजूर पाणीपुरवठा योजनेतील दुरुस्तीसाठीजांब गावातील गावकर्‍यांसह सरपंच व सदस्यांचे अमरण उपोषण सुरू
शरद पवारांचा पुन्हा यू टर्न

  बीड प्रतिनिधी – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधामध्ये बीड मधील शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक झालेत. बीड शहर पोलीस ठाण्याबाहेर जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्यासह शिवसैनिकांनी संजय राऊतांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध केला. खासदार संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्या विरोधात शिवसैनिकांनी रोष व्यक्त केला. बीड शहर पोलीस ठाण्यात याबाबत शिवसैनिकांनी तक्रार दिली असून तक्रारीनंतर शहर पोलीस ठाण्या बाहेर शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले. संजय राऊत यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. जोपर्यंत संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत बीड शहर पोलीस ठाण्यातून बाहेर पडणार नाही. असा पवित्रा या शिवसैनिकांनी घेतला आहे.

COMMENTS