Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुष्काळसदृश स्थितीत शिरूर पं.स.शेतक-यांना खंबीर साथ देईल-डॉ.सचिन सानप

शिरूर प्रतिनिधी - बीड जिल्ह्यातील उघडलेल्या पावसाने शेतकरी हतबल होत आहेत.खरिप हंगामाच्या सुरवातीला अल्प पावसाने पेरणी झाल्यानंतर पावसाने अद्याप

शिवाजीराव आढळराव पाटील यांना महायुतीतूनच विरोध
’नमामि गोदावरी’ प्रकल्पाला गती द्या ः आ. सत्यजीत तांबे
राजधानीतील मराठी साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकू

शिरूर प्रतिनिधी – बीड जिल्ह्यातील उघडलेल्या पावसाने शेतकरी हतबल होत आहेत.खरिप हंगामाच्या सुरवातीला अल्प पावसाने पेरणी झाल्यानंतर पावसाने अद्याप ही थंडी मारल्याने शिरूर तालुक्यातील सोयाबीन,मूग,उडीद,कपाशी,तुर ,बाजरी हे शेवटची घटका मोजत असतांनाच कधीतरी होणा-या पावसाने तालुक्यातील केवळ तिंतरवणी मंडळातील पीके सर्वेक्षण व पीकविमा 25%अग्रीम मंजूर करण्यात येणार असल्याने अस्मानी तसेच प्रशासकीय कालबाह्य निकषावर शेतक-यांवर अन्याय होत असल्याने शेतकर्‍यांना ग्रामप्रशासनाकडून होणा-या सहकार्य संबंधित माहिती घेण्यासाठी श्री.शिवराम राऊत व श्री.गोकुळ सानप (संपादक ) यांनी पंचायत समिती शिरूर येथे शेतकरी हितासाठी तत्पर असणारे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी श्री.सचिनजी सानप सर यांच्याशी सद्यस्थितीत दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहता शेतकर्‍यांना व नागरिकांना, ग्रामस्तरावरील टंचाई मधील सर्व योजनांचा लाभ देऊन शासनाच्या विविध योजना, पाणीपुरवठा, चारापाणी व्यवस्था, रोजगार हमी योजना मधून रोजगार उपलब्ध, मागणी प्रमाणे टँकर,बोरवेल,शेततळी, विहीर या सारख्या योजना कार्यतत्परतेने व प्राधान्याने सुरू करून शेतक-यांना टंचाई व दुष्काळ सदृश्य परिस्थिती मध्ये.शासनाच्या माध्यमातून सामना करण्यासाठी शिरूर तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले.या पूर्वी हि गटविकास अधिकारी सचिन सानप यांनी आपल्या कर्तृत्वाने शेतकर्‍यांना, विद्यार्थ्यांना, विविध सामाजिक व शैक्षणिक नाविन्यपूर्ण उपक्रमातून सहकार्य केल्याने त्यांच्या कार्यशैलीवर नागरिकांना विश्वास असल्याचेही शिवराम राऊत यांनी व्यक्त केले.व गटविकास अधिकारी यांना धन्यवाद दिले.

COMMENTS