नाशिक प्रतिनिधी - निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्म पिठाचे पिठाधिश्वर अनंत विभूषित समर्थ सदगुरू स्वामी शांतीगिरीजी मह
नाशिक प्रतिनिधी – निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्म पिठाचे पिठाधिश्वर अनंत विभूषित समर्थ सदगुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज दोनदिवसीय सिन्नर दौऱ्यावर आहेत.कालच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी बाबाजींचे फटाक्यांच्या अतिषबाजीत स्वागत व पूजन करत उत्फुर्त प्रतिसाद दिला.
जय बाबांजी भक्त परिवाराच्या व नागरिकांच्या आग्रहाखातर राजकारणाचे शुद्धीकरण आणि देशसेवेसाठी अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.जनता जनार्दनांची निष्काम सेवा केल्याने नाशिक पुण्यभूमीचा कसा विकास होऊन कायापालट होऊ शकतो.कशी विकासगंगा अवतरीत होऊ शकते.या निष्काम सेवेच्या प्रमुख अजेंड्यावर बाबाजी निवडणूक लढवत असल्याचे भक्त परिवाराच्या वतीने सांगण्यात आले.बाबाजींनी आज सिन्नर तालुक्यातील मोह,चिंचोली,मोहदरी,जामगाव,पास्ते,वडगांव, विंचूर दळवी,पांढुर्ली,बेलू, शेणीत,घोरवाड,शिवडा,कोंनांबे,
सोनांबे,सोनारी आदी गावांतील नागरिकांची बाबाजींनी भेटी घेतल्या.नागरिकांनी जागोजागी बाबाजींचे स्वागत केले.बाबाजींच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
COMMENTS