मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून कोपरगांव तालुक्यातील रस्त्यांचा विकास करणार पालकमंत्री मुश्रीफ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून कोपरगांव तालुक्यातील रस्त्यांचा विकास करणार पालकमंत्री मुश्रीफ

शिर्डी, दि.08 :- कोपरगाव परिसरातील विविध विकास कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील रस्त्य

महाराष्ट्रात सलग १९ दिवसांपासून भारनियमन नाही
गुन्हेगार बसले दिमाखात शैक्षणिक दालनात
राज्यपुरस्कृत आवास योजनेत जामखेड अव्वल

शिर्डी, दि.08 :- कोपरगाव परिसरातील विविध विकास कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील रस्त्यांचा विकास करण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन ग्राम विकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे केले.

            उप जिल्हा रुग्णालय, कोपरगांव येथे ऑक्सिजन जनरेटर प्लँट आणि विस्तारीत कोविड रुग्णालय इमारतीचे उद्घाटन आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार आशुतोष काळे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, माजी आमदार अशोक काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, उपविभागीय अधिकारी गोविंद काळे, तहसीलदार विजय बोरुडे, मुख्याधिकारी शांताराम गोसावी उपस्थित होते. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकरी कर्ज माफी योजना, गेल्या काही काळात आलेली नैसर्गिक संकटे तसेच चक्रीवादळामुळे बाधीत झालेल्यांना शासनाने केलेली मदत तसेच कोरोना संकट काळात शासनाने आपली जबाबदारी पार पाडल्याचे सांगितले. मुश्रीफ म्हणाले, कोपरगाव शहर व तालुक्यातील विविध विकास कामे पूर्ण होतील याकडे आपण स्वत: लक्ष देणार आहे.  कोरोनाची संभाव्य तिसरी लाट थेापवितानाच रुग्णालयातील बेडची संख्या वाढविण्यात येत असून ऑक्सिजन प्लँटची उभारणी करण्यात येत असल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली. आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगांव शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, तालुक्यातील शेतीला पाणी प्रश्न, कोपरगाव परिसरातील उर्वरित समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. कोपरगाव परिसरातील उर्वरित समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील असेही श्री.काळे यांनी सांगितले. ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी भरीव निधी देण्यात यावा. अशी मागणी  त्यांनी यावेळी पालकमंत्र्यांकडे केली. कोपरगांव तालुक्यातील शंभर टक्के कोविड लसीकरण पूर्ण झालेल्या ग्राम पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला तालुका वैद्यकीय अधिकारी विकास घोलप, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक कृष्णा फुलसंदर, गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी तसेच पदाधिकारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. 

COMMENTS