त्रिपुरा : त्रिपुरामध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनांचा विरोध महाराष्ट्रात करण्यात आला. त्रिपुरातील हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रात पाहायला मिळाले
त्रिपुरा : त्रिपुरामध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनांचा विरोध महाराष्ट्रात करण्यात आला. त्रिपुरातील हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रात पाहायला मिळाले. राज्यातील अमरावती, मालेगाव, नांदेड यासह अनेक शहरांत शनिवारी मुस्लिम संघटनांनी मोर्चा काढला. दरम्यान, या तिन्ही शहरांत मोर्चाला हिंसक वळण लागल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. आता महाराष्ट्रातील काही ठिकाणी झालेल्या दगडफेकीची घटनेवर त्रिपुराचे उपमुख्यमंत्री जिष्णू देव वर्मा यांनी नाराजी व्यक्त केली. तसंच त्यांनी त्रिपुराच्या नावावर असा प्रकार महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यात होणे लाजिरवाणे आहे अशा शब्दात त्यांनी घटनेचा निषेध केला.
मुख्यमंती जिष्णू देव वर्मा यांनी सर्व वर्गातील लोकांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्रिपुरामध्ये एका धार्मिक समुदायावर हल्ला झाला असल्याची अफवा पसरवली असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यात सध्या शांतता असल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले की, योग्य टीका कधीही आणि कोणत्याही सरकारसाठी चांगली आहे. मात्र, अशा प्रकारच्या अफवा पसरवणे एक षडयंत्र आहेत. त्रिपुराच्या इतिहासावर अशा प्रकारचे हल्ले कधीही सहन केले जाणार नाहीत, असा इशाराही जिष्णू देव वर्मा यांनी दिला आहे.
COMMENTS