Homeताज्या बातम्यादेश

पंतप्रधान मोदींचा दोन सर्वोच्च पुरस्कारांनी गौरव

नवी दिल्ली/सुवा : फिजीचे पंतप्रधान सितवानी राबुका यांनी स्वतः भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार देऊन गौरविले आहे.

आण्णाभाऊ साठेंचे साहित्य क्षेत्रात मोठे योगदान- माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर
रक्तदान करुन छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन
तर, रामाच्या नावाने….. 

नवी दिल्ली/सुवा : फिजीचे पंतप्रधान सितवानी राबुका यांनी स्वतः भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार देऊन गौरविले आहे. ’कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत केवळ मोजक्याच गैर-फिजी देशातील नेते, नागरिकांना हा सन्मान मिळाला आहे.
या सोबतच रिपब्लिक ऑफ पलाऊने इबाकल पुरस्कार देखील दिला आहे. हे दोन्ही पुरस्कार पंतप्रधान मोदींना पापुआ न्यू गिनीमध्येच देण्यात आले आहेत. पीएमओ इंडियाने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. पॅसिफिक बेटांतील देशांच्या एकतेच्या कारणासाठी आणि ग्लोबल साउथच्या कार्याचे नेतृत्व केल्याबद्दल पापुआ न्यू गिनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पापुआ न्यू गिनीतील फार कमी अनिवासींना हा पुरस्कार मिळाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा सन्मान फक्त माझा नाही तर 140 कोटी भारतीयांचा आहे, शतकानुशतके भारत-फिजी संबंधांचा आहे.

COMMENTS