Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुंदरगडावर साजरा झाला शाही दसरा

पाटण / प्रतिनिधी : पाटण महालातील प्रमुख असलेल्या सुंदरगड (दात्तेगड) वर दसर्‍याचे तोरण बांधून श्रीमंत सत्यजितसिंह पाटणकर यांच्या हस्ते शस्त्र पूजन, सी

Solapur : डाक विभागाने मंगळवेढा ज्वारी कव्हरचे केले अनावरण l Lok News24
सांगवड पुलाजवळ भीषण अपघात; 3 ठार, 2 गंभीर
म्हसवड शहरातील 10 घरांमध्ये चोरी; लाखोचा मुद्देमाल लंपास

पाटण / प्रतिनिधी : पाटण महालातील प्रमुख असलेल्या सुंदरगड (दात्तेगड) वर दसर्‍याचे तोरण बांधून श्रीमंत सत्यजितसिंह पाटणकर यांच्या हस्ते शस्त्र पूजन, सीमोल्लंघन करण्यात आले. यावेळी गड पूजन, गडावरील ध्वज पुजन, देव-देवतांचे पूजन करण्यात आले. इतिहासाची साक्ष असणारा पाटण महालातील सुंदरगड हे पाटण तालुक्याचे इतिहासिक वैभव आहे. या वैभवाचे जतन व संवर्धन, सुंदरगड संवर्धन समितीच्या मावळ्यांकडून होत असल्याने गड व गड परिसरात पर्यटनाला मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झाल्या आहेत. गड पर्यटनाच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास आजच्या पिढी समोर येत आहे. याचा सार्थ अभिमान वाटत असल्याचे श्रीमंत सत्यजितसिंह पाटणकर यांनी सांगितले. यावेळी पाटण वनपरिक्षेत्र अधिकारी विश्‍वहिंदू परिषदेचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष यशवंतराव जगताप, दिपक पाटणकर, शिवप्रेमी मनोहर यादव, शंकर मोहिते, लक्ष्मण चव्हाण, राम साळुंखे, विनोद साळुंखे, किसन मांडवकर, श्रीधर पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी यावेळी कोमल मांडवकर या शिवकन्येने शिवप्रताप पवाड्याचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. प्रस्ताविक शिवप्रेमी मनोहर यादव यांनी केले तर शेवटी आभार लक्ष्मण चव्हाण यांनी मानले. सुंदरगडावरील शस्त्र पूजन कार्यक्रमास सुंदरगड संवर्धन समिती, सह्याद्री प्रतिष्ठानचे शिवमालळे, ग्रामस्थ परिसरातील आबालवृध्द मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS