Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

युवकाच्या खुनातील आरोपी शहाजी (पप्पु) तेलुरेला अखेर अटक

तलवाडा प्रतिनिधी - गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे झालेल्या युवकाच्या खुनातील एक फरार आरोपी शहाजी (पप्पु) तेलुरे पोलीसांच्या नियोजनबद्ध युक्ती व

ओबीसींच्या राजकीय शक्तीला भुजबळांचा शह ?
कोपरगावचे गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील -आ.आशुतोष काळे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी.

तलवाडा प्रतिनिधी – गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे झालेल्या युवकाच्या खुनातील एक फरार आरोपी शहाजी (पप्पु) तेलुरे पोलीसांच्या नियोजनबद्ध युक्ती व रचने नुसार अखेर अटक करण्यात आला असल्याचे तपासी पोलीसांच्या वतीने मयताच्या नातेवाईकास सांगण्यात आले आहे. या बाबत अधिक माहिती अशी की तलवाडा या ठिकाणी माजलगाव रोडवर आसलेल्या त्रिमूर्ती बीअर बार ( धाब्यावर) पोईतांडा येथील युवकास शिताफीने बोलाऊन घेऊन अमानुषपणे कट रचून मारहाण करण्यात आली होती. त्या मारहाणीत सदरिल युवक गतप्राण झाल्याने या कटातील तीन आरोपिंना पोलीसांनी लागलीच अटक करत तपासाची चक्र फिरुन अटक आरोपिंनी दिलेल्या माहितीनुसार नऊ आरोपींना अटक करुन 302 सह विविध कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु फिर्यादींच्या म्हणण्यानुसार खुनातील मुख्येत: क्रमांक दोनचा आरोपी शहाजी ऊर्फ पप्पु तेलुरे हा फरार झाला होता. खुन झालेल्या मय्यत युवकांच्या नातेवाईकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक बीड यांना निवेदन देत या खुनातील फरार आरोपीस अटक करण्यासंदर्भात दिं 11/4/023 रोजी सकाळी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या आणुषंगाने बीड, गेवराई, व तलवाडा पोलिसांनी संयुक्तपणे नियोजनबद्ध युक्ती व रचने नुसार  आरोपीचा शोध घेतला त्या नुसार फरार आरोपी शहाजी ऊर्फ पप्पु तेलुरेला दिं 10/4/023 रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली. ही माहीती दिं 11/4/023 रोजी सकाळी थोड्या ऊशाराने पण वेळेवर खुनातील मय्यत युवकांच्या नातेवाईकास देण्यात आल्याने संबधित रस्तारोको आंदोलन रद्दबातल करण्यात आले असल्याची माहिती मय्यताचे नातेवाईक व तलवाडा पोलीसांनी संयुक्तरित्या माध्यमांना दिली.

COMMENTS