Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’महाराष्ट्र केसरी’ साठी मंगळवारपासून सातार्‍यात शड्डू घुमणार

सातारा / प्रतिनिधी : सातार्‍यातील जिल्हा क्रीडा संकुलात 64 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा मंगळवार, दि. 5 पासून रंगणार आहे. त्यासाठी राज्यभरातून मल्ल

माण देशी चॅम्पियन्सच्या उपक्रमामुळे म्हसवडमध्ये जलतरण स्पर्धा; राज्यातील लोकांमध्ये आश्‍चर्य
छत्रपती शिवाजी महाराज प्रीमियर लीग पर्व दुसरेचे सुपर सिक्सर विजेते
आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानचा ’कराड गौरव पुरस्कार सौ. पुष्पा कुलकर्णी यांना जाहीर

सातारा / प्रतिनिधी : सातार्‍यातील जिल्हा क्रीडा संकुलात 64 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा मंगळवार, दि. 5 पासून रंगणार आहे. त्यासाठी राज्यभरातून मल्ल शाहूनगरीत दाखल होऊ लागले आहेत. स्पर्धेसाठी 5 आखाडे तयार करण्यात आले असून त्याचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळी जिल्हाधिकारी शेखर सिंह व पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी आखाड्यांची पाहणी केली. महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू होण्यास आता अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. मंगळवारपासून सलग 4 दिवस जिल्हा क्रीडा संकुलात पैलवानांचा शड्डू घुमणार आहे. राज्यभरातून या स्पर्धेसाठी 1100 मल्ल येणार आहेत. ही स्पर्धा कुस्ती परिषद व सातारा तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने होत असल्याची माहिती संयोजकांनी दिली.
सोमवारपासून मल्ल सातार्‍यात दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. मंगळवारी दुपारपासून मल्लांचे वजन करण्यात येणार आहे. वजनानुसार गट निश्‍चित केले जाणार आहेत. सायंकाळी प्रत्यक्ष कुस्त्यांचा थरार सुरू होणार आहे. पहिल्या कुस्तीसाठी 57 किलो वजनी गटातील मल्ल एकमेकांना भिडणार आहेत. त्यानंतर 70 व 92 किलो वजनगटाच्या कुस्त्या होतील. दररोज सकाळी 7 ते 9 व सायंकाळी 5 ते रात्री 9.30 दरम्यान कुस्त्या सुरु राहतील. कुस्त्यांसाठी तयार केलेले पाचही आखाडे पूर्णत्वाकडे गेले आहेत. व्यासपीठही तयार करण्यात आले आहे. उन व पाऊस यापासून मातीतील व मॅटवरील कुस्तीस बाधा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन अच्छादनासाठी ताडपदरीची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, स्पर्धेच्या तयारीचा आढावा. जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आणि प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी घेतला. याप्रसंगी जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक, जिल्हा तालीम संघाचे साहेबराव पवार, दीपक पवार, संदीप साळुंखे, सुधीर पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS