Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी तालुक्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

देवळाली प्रवरा ः राहुरी फॅक्टरी ते कोल्हार दरम्यान असणार्‍या एका हॉटेलजवळ चालणार्‍या सेक्स रॅकेटचा राहुरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याबाबतची अ

साकुरमध्ये दिंडीतूून जपली वारकरी संस्कृतीची परंपरा
दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांप्रती अधिकाऱ्यांनी अधिक संवेदनशील रहावे : डॉ.पंकजा आशिया
महिलेच्या खुनाचा प्रयत्न करणार्‍यास सक्तमजुरी

देवळाली प्रवरा ः राहुरी फॅक्टरी ते कोल्हार दरम्यान असणार्‍या एका हॉटेलजवळ चालणार्‍या सेक्स रॅकेटचा राहुरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, राहुरीचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नगर-शिर्डी मार्गावरील कोल्हार खुर्द परिसरात हॉटेल न्यू प्रसाद जवळ असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये एक इसम परप्रांतिय महिलांकडून सेक्स रॅकेट चालवत असल्याचे समजले. ग्राहक त्यामुळे पोलीसांनी याबाबत एक बनावट ग्राहक तयार केला.
          मोहसीन मुक्तार शेख वय 26 रा.राहुरी फॅक्टरी याला बनावट ग्राहक बनवून पोलीस त्याच्याबरोबर सदर हॉटेलच्या जवळ गेले.ठरल्या प्रमाणे पंचासमक्ष सदर ग्राहकाकडे 500 रुपयाची नोट दिली. आणि सदर बनावट ग्राहक हा सदर हॉटेल जवळ असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गेला असता तिथे एक इसम होता. आणि बाहेर एक व आत एक महिला होती. पोलिसांनी सांगितल्या प्रमाणे सौदा ठरल्यानंतर बनावट ग्राहक असलेल्या मोहसीन याने पोलिसांना मिस्कॉल केला. त्यामुळे पोलिस लगेच त्या शेडजवळ गेले. तेथे एक इसम आणि दोन महिला आत असल्याचे दिसून आले. सदर शेडमध्ये बगाराम गुमनाराम चौधरी वय 39 रा. बुडतला, ता. सिव.जि. बाडमेर, (राजस्थान) हा त्याच्या आर्थिक फायदासाठी या महिलांकडून वेशाव्यवसाय करुन घेत असल्याचे आढळून आले. त्याठिकाणी पश्‍चिम बंगालच्या दोन महिला वय अनुक्रमे 31 आणि 36 यांच्याकडून सदर आरोपी हा ग्राहकांकडून पैसे घेऊन वेशा व्यवसाय चालवत असल्याचे पोलिसांना आढळून आले.पोलीसांनी सदर आरोपी बगाराम गुमनाराम चौधरी याच्या विरोधात गु. र. नं. 839 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहे.

COMMENTS