अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहराच्या मध्यवर्ती परिसरातील गौरी घुमट येथे मनपाने सात पक्क्या अतिक्रमणांवर कारवाई करून ती जमीनदोस्त केली. उच्च न्यायालयाच्या
अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहराच्या मध्यवर्ती परिसरातील गौरी घुमट येथे मनपाने सात पक्क्या अतिक्रमणांवर कारवाई करून ती जमीनदोस्त केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुरुवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. गौरी घुमट परिसरात महापालिकेची मोकळी जागा आहे. या जागेवर अनेक वर्षांपासून पक्की अतिक्रमणे करण्यात आली होती. या संदर्भात तेथील स्थानिक रहिवासी नामदे यांनी तक्रार केली होती. उच्च न्यायालयात याबाबत सुनावणी होऊन कारवाईचे आदेश महापालिकेला देण्यात आले होते. 5 मेपर्यंत कारवाई करून 6 मे रोजी अहवाल सादर करण्याच्या सूचना न्यायालयाने महापालिकेला दिल्या होत्या तसेच पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याबाबत आदेश देण्यात आले होते. त्यानुसार महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने गुरुवारी सकाळी पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरू केली. गौरी घुमट व मनपा शाळेच्या दरम्यान असलेल्या मोकळ्या जागेतील निवासी व व्यावसायिक अशी 7 पक्की अतिक्रमणे जेसीबीच्या साहायाने जमीनदोस्त करण्यात आली. शहर अभियंता सुरेश इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय अधिकारी रिजवान शेख व त्यांच्या सहकारी कर्मचार्यांनी ही कारवाई केली.
COMMENTS