गेवराई प्रतिनिधी - सन 2020 चा प्रलंबित असलेला पिकविमा शेतकर्यांना तात्काळ द्या, चालू वर्षाचा पिकविमा शेतकर्यांच्या खात्यात जमा झालाच पाहिजे,

गेवराई प्रतिनिधी – सन 2020 चा प्रलंबित असलेला पिकविमा शेतकर्यांना तात्काळ द्या, चालू वर्षाचा पिकविमा शेतकर्यांच्या खात्यात जमा झालाच पाहिजे, बेरोजगार तरुणांसाठी गेवराईत एमआयडीसी झालीच पाहिजे, शेतकर्यांसाठी वीजपुरवठा नियमित झालाच पाहिजे आदी मागण्यांसाठी गेवराई तहसील कार्यालयावर भारत राष्ट्र समितीचा मोर्चा गुरुवारी रोजी धडकला. यावेळी घोषणांनी तहसील परिसर दणाणून गेला होता. तालुक्यातील शेतकरी, नागरिक, तरुणांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभाग नोंदवला होता.
भारत राष्ट्र समितीच्या गेवराई विधानसभा समन्वयक मयुरीताई बाळासाहेब मस्के-खेडकर,. युवा नेते बाळासाहेब मस्के यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार दि. 10 आँगस्ट 2023 रोजी सकाळी सर्व शेतकरी व बेरोजगार युवक यांच्या विविध मागण्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय गेवराई पर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला. शेतकरी, सामान्य जनता, नागरिक यांच्या विविध सोडवण्यासाठी तसेच शेतकरी यांना मागील अनुदान आणि पीकविमा मिळावा यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
COMMENTS