Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील यांना रत्नसिंधू जीवन गौरव पुरस्कार जाहीर

इस्लामपूर / प्रतिनिधी : कामेरी (ता. वाळवा) येथील ज्येष्ठ साहित्यिक कादंबरीकार दि. बा. पाटील यांची निवड 2022 च्या राज्यस्तरीय रत्नसिंधू जीवनगौरव प

इस्लामपूर पालिका निवडणूकीत प्रभाग 10 मध्ये शिवसेनेला तगडे आव्हान
कोर्टाच्या सुरक्षेसाठी चौक्या उभाराव्यात; वाढत्या गोळीबारावरून सर्वोच्च न्यायालय चिंतेत
पक्षाच्या बळकटीसाठी कार्यकर्त्यांनी निष्ठेने काम करावे : ना. जयंत पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : कामेरी (ता. वाळवा) येथील ज्येष्ठ साहित्यिक कादंबरीकार दि. बा. पाटील यांची निवड 2022 च्या राज्यस्तरीय रत्नसिंधू जीवनगौरव पुरस्कारासाठी केली आहे. या पुरस्काराचे वितरण 15 एप्रिल रोजी रत्नागिरी येथे होणार आहे. रोख रक्कम, शाल, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, असे त्याचे स्वरूप आहे. या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
रत्नसिंधू कोकण विभाग कलामंचचे संस्थापक अध्यक्ष सुनील गोविंद जाधव यांच्यावतीने उत्कृष्ठ साहित्यकाची निवड रत्नसिंधु जीवन गौरव राज्यस्तरिय पुरस्कारासाठी तसेच कलाकृतींच्या उत्स्फुर्त वाचनातून निवड केली जाते. यासाठी प्रस्ताव मागविला जात नाही. महाराष्ट्रात गाजलेले अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ समीक्षकांनी गौरविलेल्या मराठी कथा, कादंबरी, ललित अशा 12 कलाकृतींचे लेखक, ग्रामीण संमेलनाचे आयोजक, सुनील गोविंद जाधव संस्थापक अध्यक्ष रत्नसिंधू कोकण विभाग कलामंच, महाराष्ट्र यांनी हा पुरस्कार जाहीर केला आहे. आत्तापर्यंत दि. बा. पाटील यांना साहित्य सेवेसाठी चळवळीच्या योगदानाबद्दल राज्य पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे.

COMMENTS