Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खेड्या-पाड्यात 10 हजारात चोरीच्या दुचाकींची विक्री; दोघांना पोलिस पथकाने उचलले

लातूर प्रतिनिधी - शहरासह जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दुचाकी, तीनचाकीसह चारचाकी वाहने पळविण्याच्या घटनांमध्ये अलीकडे मोठ्या प्रमाणात

मराठवाडा मुक्तीचा लढा भारतीय स्वातंत्र्याच्या तोलामोलाचा – मंत्री मुनगंटीवार
आई-वडिल अशिक्षित असूनही संघरत्न झाला उपशिक्षणाधिकारी
श्री स्वामी समर्थ महाराज केंद्रात नेत्ररोग व मोतीबिंदू तपासणी

लातूर प्रतिनिधी – शहरासह जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दुचाकी, तीनचाकीसह चारचाकी वाहने पळविण्याच्या घटनांमध्ये अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दुचाकी चोरणार्‍या आणि त्याची दहा ते पंधरा हजारांत विल्हेवाट लावणार्‍या टोळीतील दोघा सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोघेही औसा तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली असून, त्यांच्याकडून आतापर्यंत सात दुचाकी जप्त केल्या आहेत.
लातूर शहरातील शाळा-महाविद्यालय, क्लासेस परिसर आणि बाजारपेठेतील गर्दीच्या ठिकाणी पार्किंग केलेल्या दुचाकींवर या टोळीची विशेष नजर आहे. वाहनधारक आपले वाहन पार्क करून गेल्यानंतर त्यांच्यावर नजर ठेवत दुचाकी पळविल्या जात आहेत. लातूर जिल्ह्यात दिवसाला किमान एक ते दोन दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत. याबाबत त्या-त्या पोलिस ठाण्यांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. मात्र, चोरट्यांचा सुगावा लागत नसल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून टोळीतील काही जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आता औसा तालुक्यातील दोघा दुचाकी चोरट्यांना पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सात दुचाकी जप्त केल्या आहेत. लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागातून पळविण्यात आलेल्या वाहनांची काही हजारांमध्ये विल्हेवाट लावणारी टोळी सक्रिय आहे. दुचाकी चोरल्यानंतर काही वेळात तिचे पार्टस् काढून स्वतंत्र केले जातात. त्या पार्टसची विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. तर वाडी-तांडे, खेड्या-पाड्यात केवळ दहा ते पंधरा हजारांत दुचाकीची विक्री करणारे रॅकेट सक्रिय आहे. औसा तालुक्यातील खेड्यात एक नव्हे तब्बल दहा ते पंधरा जणांनी चोरीच्या दुचाकी कमी दामात मिळत असल्याच्या लालसेतून घेतल्या आहेत. वाहन चोरणार्‍या टोळीतील दोघांना उचलल्यानंतर या दुचाकी खेरी करणार्‍यांची नावे समोर आली आहेत. आता त्यांचीही चौकशी सुरु आहे. कमी दामात दुचाकी घेतले अन् पोलिसांच्या चौकशीत अडकले, अशीच कोंडी झाली आहे.

COMMENTS