Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मेहता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींची नवोदयसाठी निवड

कोपरगाव प्रतिनिधी ःकेंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय यांचे अंतर्गत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ शहरी व ग्रामीण भागातील, विशेष करून ग्रामी

ओबीसी आरक्षणाशिवाय कोणतीही निवडणूक घेऊ नये : ओबीसी काँग्रेसची मागणी
आंबेवाडी तांडा येथे बिबट्याचे दर्शन
विखेंचा आज थोरातांच्या गावात मोर्चा…वीज बिल वसुलीचा निषेध

कोपरगाव प्रतिनिधी ःकेंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय यांचे अंतर्गत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ शहरी व ग्रामीण भागातील, विशेष करून ग्रामीण भागातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांना शहरी भागातील विद्यार्थ्यांबरोबर शिक्षणाच्या प्रवाहात आणून स्पर्धा निर्माण करण्यासाठी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे आयोजन करते,परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांना जवाहर विद्यालयात प्रवेश दिला जातो. या विदयार्थ्यांचे 6 वी ते 12 वी पर्यंतच्या शिक्षणाचा खर्च हा केंद्र सरकार करत असते.
कोपरगाव येथील डॉ. सी एम मेहता कन्या विद्यालयाच्या पावनी भोईर व श्रेया सुपेकर या प्रवेश परीक्षा पास होऊन त्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. या विद्यर्थिनींचा नुकताच विद्यालयाच्या प्रथम प्रवेशित विद्यार्थिनी प्रमोदिनी देवळालीकर, विद्यालयाच्या प्राचार्या प्रमोदिनी शेलार, उपमुख्याध्यापक रावसाहेब शिंदे, पर्यवेक्षक सुरेश सोनवणे, मेहबूब शेख यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. या विद्यार्थिनींना ज्योती गायकवाड, मनीषा कोकणी, गीतांजली गायकवाड, उमेश पवार, रामभाऊ पवार, निर्मळ मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थिनींचे स्थानिक स्कुल कमिटी, स्थानिक सल्लागार समिती, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, विद्यालयाचे सर्व अधिकारी, सर्व सेवक, पालक, व विद्यार्थिनी यांनी हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS