Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डाटा एन्ट्री ऑपरेटरच्या मुलीची एमबीबीएसला निवड

कर्जत : सध्या सुरू असलेल्या सन 2024 च्या मेडिकल प्रवेश प्रक्रियेमधून कु. कोमल सोमीनाथ गोपाळघरे हीची शासकीय ग्रँड मेडिकल कॉलेज, मुंबई या ठिकाणी एम

नगर तालुका बाजार समितीच्या 18 जागांसाठी 228जण रिंगणात
नऊ निलंबित पोलीस पुन्हा झाले सेवेत रुजू
10 हजार थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत

कर्जत : सध्या सुरू असलेल्या सन 2024 च्या मेडिकल प्रवेश प्रक्रियेमधून कु. कोमल सोमीनाथ गोपाळघरे हीची शासकीय ग्रँड मेडिकल कॉलेज, मुंबई या ठिकाणी एमबीबीएससाठी निवड झाली आहे. कु. कोमल ही कर्जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कार्यरत असलेले डाटा एन्ट्री ऑपरेटर सोमीनाथ गोपाळघरे यांची कन्या आहे. खडतर परिश्रम आणि अभ्यासातील चिकाटीच्या जोरावर तिने नीट परीक्षेत 669 गुण मिळवून पहिल्याच फेरीत मुंबईतील नामांकित शासकीय ग्रँड मेडिकल कॉलेज अर्थात जे. जे. हॉस्पिटल येथे सहजपणे प्रवेश मिळवला आहे. कोमलचे प्राथमिक शिक्षण कर्जत येथील यशवंत प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण सौ. सो. ना. सोनमाळी विद्यालय, कर्जत येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण सद्गुरु उच्च माध्यमिक कन्या विद्यालय, कर्जत येथे झाले. एका डाटा एन्ट्री ऑपरेटरच्या मुलीने एमबीबीएससाठी प्रवेश मिळवणे ही गोष्ट सामान्य कुटुंबातून वैद्यकीय अभ्यासक्रमाचे स्वप्न पाहणार्‍या मुलींसाठी प्रेरणादायी आहे. कोमलच्या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तिच्या या एमबीबीएस प्रवेशाबद्दल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रदीप शिंदे, सर्व अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय तज्ञ, कर्मचारी वृंद, विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच समस्त शिक्षक बांधवांनी अभिनंदन करून तिच्या पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS