भाजप सरकारला चलेजाव म्हणण्याची वेळ ; थोरात यांची टीका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजप सरकारला चलेजाव म्हणण्याची वेळ ; थोरात यांची टीका

केंद्रातील भाजप सरकार हे केवळ नफेखोरीसाठी काम करत आहे.

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने अनुदान द्या
तुम्ही हाक द्या आम्ही साथ देण्यासाठी सज्ज ः विवेक  कोल्हे
रोहित पवारांच्या कारखान्याला साडेचार लाखाचा दंड

श्रीरामपूर/प्रतिनिधी : केंद्रातील भाजप सरकार हे केवळ नफेखोरीसाठी काम करत आहे. पेट्रोलवर भरमसाठ कर लादून सर्वसामान्य जनतेला ते वेठीस धरत आहे. त्यामुळे या सरकारला चले जाव म्हणण्याची वेळ आली आहे, असा इशारा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला. 

दिल्लीतील शेतकरी आंदोलकांनी दिलेल्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी येथील प्रशासकीय इमारतीसमोर आयोजित धरणे आंदोलनात थोरात बोलत होते. या वेळी आमदार लहू कानडे, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, ज्ञानदेव वाफारे, सचिन गुजर, अंकुश कानडे, अरुण नाईक, ज्ञानेश्‍वर मुरकुटे, वंदना मुरकुटे, इंद्रनाथ थोरात आदी उपस्थित होते. ते म्हणाले, की मोदी सरकार हे केवळ भांडवलदार आणि नफेखोरांसाठी काम करत आहे. तीन कृषी कायदे हे नफेखोरीसाठी साठेबाजी करायला वाव देणारे आहेत. त्यामुळे पंजाब राज्यात मोठमोठी गोदामे बांधण्यात आली आहेत. या काळ्या कायद्यांमुळे शहरातील नागरिकांना महागात शेतमाल खरेदी करावा लागेल. दिल्लीतील शेतकरी आंदोलन हे ऐतिहासिक ठरले आहे. जगभर त्याची दखल घेतली गेली आहे; मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकर्‍यांना सामोरे जाण्यास तयार नाहीत. शेतकर्‍यांचे ऐकून घेण्याची त्यांची मानसिकता नाही. त्यामुळे या सरकारला चले जाव म्हणण्याची वेळ आली आहे.

COMMENTS