Homeताज्या बातम्यादेश

अनंतनागमध्ये शोधमोहीम सुरू

श्रीनगर ः जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमधील कोकरनागमध्ये तिसर्‍या दिवशीही शोधमोहीम सुरूच आहे. शनिवारी सुरक्षा दलांना अनंतनागमध्ये दहशतवादी लपल्याची म

निवडणूक नियमातील बदलाला “सर्वोच्च’ आव्हान : काँग्रेसने केली सर्वोच्च न्यायालयात याचिका
१०० सायकलस्वार करणार पाच राज्ये व बांगलादेशातून ३००० किलोमीटरचा प्रवास
देशभर कठोर टाळेबंदी नाही : अर्थमंत्री

श्रीनगर ः जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमधील कोकरनागमध्ये तिसर्‍या दिवशीही शोधमोहीम सुरूच आहे. शनिवारी सुरक्षा दलांना अनंतनागमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारात हवालदार दीपक कुमार यादव आणि लान्स नाईक प्रवीण शर्मा शहीद झाले. या गोळीबारात दोन नागरिकही जखमी झाले असून त्यापैकी एकाचा रविवारी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. सोमवारी देखील दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे.

COMMENTS