Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेपत्ता आईचा शोध लावा, मुलांचे पोलिसांना साकडे

अहमदनगर/प्रतिनिधी ः घरातून बेपत्ता झालेल्या आईचा शोध लावण्याचे साकडे तिच्या मुलांनी पोलिसांना घातले आहे. वडिलांसह त्यांच्या दोन लहान मुलांनी जिल

ज्वारी सुधार प्रकल्पाचे कार्य उल्लेखनीय : कुलगुरु डॉ.पाटील
चोरी-घरफोडी करणारे सराईत चोरटे पकडले; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
कर्जत ’महसूल’चा भोंगळ कारभार ?

अहमदनगर/प्रतिनिधी ः घरातून बेपत्ता झालेल्या आईचा शोध लावण्याचे साकडे तिच्या मुलांनी पोलिसांना घातले आहे. वडिलांसह त्यांच्या दोन लहान मुलांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे बेपत्ता झालेली (आई) कविता शेळके हिचा शोध घेण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

कविता अशोक शेळके (वय 29 वर्षे) या चास (ता. अकोले) येथून 29 नोव्हेंबरपासून बेपत्ता आहेत. त्यांचे पती राहुरीला एका लग्नाला गेले असता हा प्रकार घडला. सर्व नातेवाईकांकडे विचारपूस करुनदेखील पत्नीचा शोध लागत नसल्याने पती अशोक शेळके यांनी अकोले पोलिस स्टेशनला हरवल्याची तक्रार दिली आहे. पण, आईच्या विरहाने कासावीस झालेल्या मुलांची अवस्था पाहून ते वारंवार पोलिसांकडे तपासाबाबत विचारणा करीत आहे. मात्र पोलिसांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने वडील व मुलांनी थेट पोलिस अधीक्षक कार्यालय गाठून पोलिस अधीक्षकांकडे कविता शेळके यांचा शोध घेण्याची मागणी केली आहे. पत्नीचा तपास न लागल्यास मुलाबाळांसह उपोषण करण्याचा इशारा अशोक शेळके यांनी दिला आहे.

COMMENTS