Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दहा दिवसांच्या बाप्पासाठी मनपा कडून झाडावरच करवत….  

नाशिक प्रतिनिधी - बाप्पा च्या स्वागताला आपण नको ती हिरवळ व शोभेच्या वस्तू आणून पर्यावरण पूरक गणपती बसवत असतो . पर्यावरनाचा ऱ्हास नको म्हणून ल

राजकारणातील उलटफेर
…तर, परवाना निरीक्षकांवर फौजदारी कारवाई
शिराळा तालुक्यात लॉकडाउननंतर पहिल्या कुस्ती मैदानास प्रारंभ

नाशिक प्रतिनिधी – बाप्पा च्या स्वागताला आपण नको ती हिरवळ व शोभेच्या वस्तू आणून पर्यावरण पूरक गणपती बसवत असतो . पर्यावरनाचा ऱ्हास नको म्हणून लागेल त्या युक्त्या गणपती मध्ये प्रदर्शनात मांडत वा उभारत असतो.तर दुसरीकडे मनपा प्रशासन कुणाच्या सांगण्यावरून हा झाडे तोडण्याचा अतिरेक करत आहेत. उभे झाड तोडून काँक्रीट च्या जंगलातील अजून किती झाडांची बळी घेणार आहात. यंदा ह्या ठिकाणी मनपा ने एकही नवीन झाड न लावल्याने उदासीनता असून पर्यावरण पूरक गणपतीची परिपत्रके आपण मोठ्या थाटाने मिरवत असतात.मग असे झाडे तोडून आपण मंडळांना सूचित करतात वा किंबहुना आपणच त्यांना झाडे तोडून देऊन जागा तयार करून देतात म्हणजे आपल्या कडून पर्यावरण संवर्धन होते काय ? असा सवाल पत्रकार भवन परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहेत.

मनपाकडून यंदा एकही झाड पत्रकार भवन परिसरात लावण्यात आलेले नाहीत. गणपती बाप्पा हे पर्यावरण पुरकच असायला हवे मात्र तसे होतांना दिसत नाहीत मनपा जनतेची नेहमीच दिशाभूल करत असते आणि आपली कामे नेटाने करत असल्याचा आज येथे खोटा प्रत्येय येतो आहेत.

पोलीस यंत्रणेकडून पर्यावरण पूरक गणपती बसविण्यासाठी गणेश मंडळांना अधोरेखीत सूचना वजा परिपत्रके निर्गमित केलेली असतांना दोन दिवसात बापाचं आगमन होईल आणि मनपा प्रशासन झोपेत काम करण्याचा बहाना करत झाडावर निर्दयी  पणे करवत चालवत आहेत.

झाडांमुळे जर गणपती जागेला अडचण होत असेल तर गणपती चे सेड बाजूला सरकवून घेण्यास काय हरकत आहेत परंतु पालिका अशी हरकत घेत नाही उलट पर्यावरणचा ऱ्हास कसा होईल आणि आपले काम सोपे कसे होईल अशा अविर्भावात झाडाची कत्तल करतांना दिसतात.

COMMENTS