Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दूध दरासंदर्भात शनिवारी बैठक

मुंबई : राज्याचे महसूल तथा पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दूध दरवाढी संदर्भात दूध प्रकल्प

कर्जत-जामखेडच्या एमआयडीसीसाठी आमदार रोहित पवारांचे आंदोलन
वसंतदादा पाटील महाविद्यालयात स्वा. सावरकर यांची जयंती साजरी
पेटत्या सुटकेसमध्ये सापडला तरुणाचा मृतदेह | LokNews24

मुंबई : राज्याचे महसूल तथा पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दूध दरवाढी संदर्भात दूध प्रकल्प प्रतिनिधी व दुध उत्पादक शेतकरी यांची महत्वाची बैठक येत्या शनिवारी विधानभवनात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या समस्या जाणून त्यावर तोडगा काढला जाणार आहे.  
या बैठकीला राज्यातील खाजगी तथा सहकारी दूध महासंघाचे प्रतिनिधी, दूध उत्पादक शेतकर्‍यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त प्रशांत मोहोड यांनी सांगितले. सदर बैठकीत शेतकर्‍यांचे प्रश्‍न जाणून घेत त्यावर सविस्तर चर्चा करण्यात येईल व या बैठकीचा अहवाल मंत्रीमंडळासमोर सादर करण्यात येईल. तसेच लवकरच दुध उत्पादक शेतकर्‍यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल असे आयुक्तांनी सांगितले.

COMMENTS