श्रीरामपूर ः श्रीरामपूर हे अनेकांच्या योगदानातून आकाराला आलेले शहर असून 1967 पासून श्रीरामपूरच्या विविध व्यवसाय, उद्योग विश्वास योगदान देणारे ज्
श्रीरामपूर ः श्रीरामपूर हे अनेकांच्या योगदानातून आकाराला आलेले शहर असून 1967 पासून श्रीरामपूरच्या विविध व्यवसाय, उद्योग विश्वास योगदान देणारे ज्येष्ठ नागरिक आनंद मेळाव्याचे समाजसेवेत सहभागी असलेले सतोबा राऊत हे उद्योगभूषण व्यक्तिमत्त्व असल्याचे मत प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी व्यक्त केले.
येथील बेलापूर रोडवरील सतोबा राऊत उद्योग प्रॉडक्टस उपक्रमास मित्रपरिवार भेटीप्रसंगी ते बोलत होते. प्राचार्य टी.ई. शेळके, डॉ. बाबुराव उपाध्ये, सुखदेव सुकळे, अतुल गुंड यांनी सतोबा राऊत यांच्या युवकांसाठी रोजगार निर्मिती आणि विविध वाहन उपयुक्त प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल सन्मानपूर्वक कौतुक केले. प्रथमेश सचिन पुंड, राजेश भारत राऊत, ओम रवी डहाळे या युवकांच्या जीवनात नवी ऊर्मी आणि श्रमातून प्रगतीकडे या ध्येय उपक्रमाचे सर्वांनी प्रशंसा केली प्रा. बारगळ यांनी उद्योग प्रॉडक्टसच्या विविध भागांची माहिती घेऊन या उपक्रमाचे शहराला भूषण असल्याचे सांगितले. सतोबा राऊत यांनी सांगितले की, यातील बरीशची यंत्रे मी स्वतः बनविली असून कोणत्याही प्रकारची नादुरुस्त गाडी येथे दुरूस्त होते. हाच सोपा तंत्रमंत्र विविध युवकांना येथे शिकविला जातो, त्यातून नवी पिढी नोकरीचा मागे न लागता स्वाभिमानाने उद्योग सुरू करतात अशी माहिती दिली. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी असे उद्योगभूषण व्यक्तिमत्त्व दिशादर्शक आहे श्रीरामपूर शहरात अशी उद्योगनिर्मिती प्रेरक असल्याचे सांगून त्यांनी आभार मानले.
COMMENTS