Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातभाई व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरची शंभर टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम

कोपरगाव प्रतिनिधी ः महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ यांच्यामार

आमदार मोनिका राजळेंच्या दिवाळी फराळाला भाजपा नेते,पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने राहिले उपस्थित
विद्यार्थिनींनी बनवल्या टाकाऊपासून टिकाऊ वस्तू
रेन्बो स्कूलमध्ये खो-खो स्पर्धांना सुरुवात

कोपरगाव प्रतिनिधी ः महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ यांच्यामार्फत जून-2023 मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेचा निकाल नुकताच लागला. त्यामध्ये ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे बाळासाहेब सातभाई व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर कोपरगाव या मान्यताप्राप्त महाविद्यालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या दोन्ही अभ्यासक्रमांचा निकाल 100 टक्के लागला. त्यात तब्बल 32 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहे.अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे यांनी दिली आहे.
हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमात प्रथम क्रमांक मयुरेश राजेंद्र काळे (75 टक्के), द्वितीय क्रमांक अजय किशोर गांगुर्डे (72.83 टक्के), तृतीय क्रमांक जयेश सत्यवान बडवर (71.50 टक्के). तर बांधकाम पर्यवेक्षक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या अभ्यासक्रमात प्रथम क्रमांक मनीषा रावसाहेब कुटे (78 टक्के), विकास लक्ष्मण शिंदे (77.50 टक्के), तर तृतीय क्रमांक वैष्णवी श्रीपत गंडे (75.17 टक्के) मार्क मिळवत यश मिळविले आहे. तर प्रज्ञा घोडेराव, यशवंत कडू, प्रकाश वेठेकर, विजय बोराडे, आनंद देशमुख, रोहिणी जाधव, प्रियंका वाघ, संतोष गंगवाल, समाधान बडवर, अफताब पठाण,  श्रीकांत धोत्रे, प्रसाद गंडे,  पांडुरंग कदम, सौरभ पांडे, स्वप्नील कडू, भीमा मांजरे,  विलास ढमाले,  संजय महाले, संदीप खैरनार, ऋषिकेश चौधरी,  सुनील जगताप, अपूर्व गोसावी, जयेश बाविस्कर, शुभम दाणे आदी विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे मार्गदर्शक कोपरगावचे माजी नगराध्यक्ष संजय सातभाई,माजी नगराध्यक्ष ऐश्‍वर्या सातभाई, ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे, सचिव सुचित्रा साबळे, रजिस्टार बापू डांगे, बाळासाहेब सातभाई व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरचे प्रा विजय कापसे, कमलाताई बाळासाहेब सातभाई तांत्रिक ज्युनिअर कॉलेजचे प्रा विशाल धरणगावकर, साई शक्ती इंग्लिश मीडियम स्कूलचे विजय जाधव,राजेंद्र आचारी, राजेंद्र आहेर, सोनाली कापसे, जनार्दन सुपेकर, निलेश देवकर, रेखा दिवे आदि शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांसह सर्व आजी-माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS