नवी दिल्ली : उत्तम संसदीय कामगिरीबद्दल देशातील 13 खासदारांना यंदाचा ‘संसद रत्न’ पुरस्कार जाहीर झाला. यामध्ये महाराष्ट्रातील डॉ. अमोल कोल्हे, हिना
नवी दिल्ली : उत्तम संसदीय कामगिरीबद्दल देशातील 13 खासदारांना यंदाचा ‘संसद रत्न’ पुरस्कार जाहीर झाला. यामध्ये महाराष्ट्रातील डॉ. अमोल कोल्हे, हिना गावित, फौजिया खान व गोपाळ शेट्टी यांचा समावेश आहे.
यावर्षी ‘संसद रत्न’ पुरस्कारासाठी लोकसभा व राज्यसभेचे मिळून 13 खासदारांचे नामांकन जाहीर करण्यात आले आहे. या खासदारांमध्ये लोकसभेचे 8 आणि राज्यसभेच्या 5 सदस्यांचा समावेश आहे. ‘संसद रत्न’पुरस्कार मिळवणार्या सदस्यांमध्ये महाराष्ट्रातील 4 खासदारांचाही समावेश आहे. यामध्ये 2 राष्ट्रवादी काँग्रेसचे तर भाजपच्या 2 खासदारांचा समावेश आहे. आगामी 25 मार्च रोजी हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. ‘संसद रत्न’पुरस्काराच्या नामांकनासाठी केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. कृष्णमूर्ती यांच्या सह-अध्यक्षपदी संसदपटू व नागरी समाजातील ज्यूरीची एक समिती स्थापन करण्यात आली होती. ज्युरीने विशेष पुरस्कार श्रेणी अंतर्गत दोन विभागांशी संबंधित स्थायी समित्या आणि एका प्रतिष्ठित नेत्याला नामनिर्देशित केले. या समितीमध्ये वरिष्ठ खासदार आणि नागरी समाजाचे सदस्यांचा समावेश होता. सतराव्या लोकसभेच्या सुरुवातीपासून ते हिवाळी अधिवेशन 2022 पर्यंत सभागृहात उपस्थित केले प्रश्न, मांडलेली विधेयके आणि सदस्यांवरील चर्चेदरम्यानच्या त्यांच्या कामगिरीवर या पुरस्काराचे नामांकन करण्यात आले आहे.
COMMENTS