Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवळाली प्रवरा नगरपरिषदेत भाजपच्या गटनेतेपदी संसारे

देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता काबीज केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या सर्व वि

राहुरीत गुन्हेगारी वाढली, पोलिसांची पकड सैलच !
गाईचे श्राद्ध ! देवळाली प्रवरात श्रद्धा, परंपरारेचा अनोखा संदेश
टाकळिमियाँ ग्रामपंचायतीत ६९ लाखांचा आर्थिक अपहार?

देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता काबीज केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या सर्व विजयी नगरसेवकांची अधिकृत गटनोंदणी करण्यात आली असून, नगरसेवक प्रकाश मार्शल संसारे यांची सर्वानुमते गटनेते तथा पक्षप्रतोद म्हणून निवड करण्यात आली आहे.

 नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी २० डिसेंबर रोजी मतदान तर २१ डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत एकूण २१ नगरसेवकांपैकी १५ नगरसेवक भाजपचे विजयी झाले. तसेच सत्यजित कदम यांची नगराध्यक्षपदी निवड झाली आहे.

 भाजपच्या सर्व नगरसेवकांची गटनोंदणी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे सादर करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या उपस्थितीत प्रकाश संसारे यांची गटनेते व पक्षप्रतोदपदी निवड जाहीर करण्यात आली.

 यावेळी नगरसेवक सत्यजित कदम, प्रकाश संसारे, अजित चव्हाण, अमोल कदम, वसंत कदम, बाळासाहेब लोखंडे, सौरभ मुसमाडे, सुजाता कदम, बेबी बर्डे, सिंधुबाई वाळुंज, मनीषा कदम, सुवर्णा कोठुळे, जयश्री खांदे, चंदाराणी गाडे, सीमा देठे, पुष्पा तांबे आदी उपस्थित होते.

COMMENTS