कोपरगाव : पश्चिम विभागीय राष्ट्रीय भव्य ब्रास बॅन्ड स्पर्धेत संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या ब्रास बॅन्ड पथकाने अप्रतिम सुरावटी आणि शिस्तबद्ध सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकावला. हे पथक आता प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय ब्रास बॅन्ड स्पर्धेत पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे अशी माहिती संस्थेचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी दिली. ते म्हणाले, केंद्र सरकारचे शैक्षणिक मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण तसेच पुणे येथील राज्य शैक्षणीक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शिस्तबद्ध आणि कलात्मक सादरीकरण करून संजीवनीच्या बॅण्ड पथकाने पश्चिम विभागात प्रथम क्रमांक मिळवीला. संजीवनीने सलग दुसऱ्या वर्षी ब्रास बॅन्ड स्पर्धेत राज्यात अव्वल असल्याचे यापूर्वी सिध्द केले. आता देश पातळीवरील पश्चिम विभागीय स्पर्धेतही अव्वल स्थान पटकावले. या स्पर्धेत पश्चिम विभागातुन महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, राजस्थान, दादरा नगर हवेली, दीव दमण या राज्य व केंद्रशासित प्रदेशातील सर्वोत्तम १५ संघांमधून संजीवनीने विजयी मोहर उमटवली. संगीत शिक्षक महेश गुरव यांचे मार्गदर्शन या संघास लाभले. इयत्ता दहावीतील विद्यार्थी विपुल दीपक वाघ यांच्या नेतृत्वाखाली ३३ कलांकारांनी ही विजयी कामगीरी केली. संस्थेचे अध्यक्ष नितिन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे, डायरेक्टर डी. एन. सांगळे, प्राचार्य कैलास दरेकर, कॅम्पस ऍडमिन विजय भास्कर यांनी या संघास शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय पातळीवरील पश्चिम विभागातून प्रथम क्रमांक पटकावणारा संजीवनीचा संघ देश पातळीवरील राष्ट्रीय स्पर्धेत पश्चिम विभागाचे नेतृत्व करणार आहे. सध्या या पथकाचा कसून सराव सुरू आहे. राष्ट्रीय पातळीवर यश संपादन करण्यासाठी हा सराव सुरू आहे अशी प्रतिक्रिया विश्वस्त सुमित कोल्हे यांनी दिली.

कोपरगाव : पश्चिम विभागीय राष्ट्रीय भव्य ब्रास बॅन्ड स्पर्धेत संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या ब्रास बॅन्ड पथकाने अप्रतिम सुरावटी आणि शिस्तबद्ध सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकावला. हे पथक आता प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय ब्रास बॅन्ड स्पर्धेत पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे अशी माहिती संस्थेचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी दिली.
ते म्हणाले, केंद्र सरकारचे शैक्षणिक मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण तसेच पुणे येथील राज्य शैक्षणीक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शिस्तबद्ध आणि कलात्मक सादरीकरण करून संजीवनीच्या बॅण्ड पथकाने पश्चिम विभागात प्रथम क्रमांक मिळवीला. संजीवनीने सलग दुसऱ्या वर्षी ब्रास बॅन्ड स्पर्धेत राज्यात अव्वल असल्याचे यापूर्वी सिध्द केले. आता देश पातळीवरील पश्चिम विभागीय स्पर्धेतही अव्वल स्थान पटकावले.
या स्पर्धेत पश्चिम विभागातुन महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, राजस्थान, दादरा नगर हवेली, दीव दमण या राज्य व केंद्रशासित प्रदेशातील सर्वोत्तम १५ संघांमधून संजीवनीने विजयी मोहर उमटवली. संगीत शिक्षक महेश गुरव यांचे मार्गदर्शन या संघास लाभले. इयत्ता दहावीतील विद्यार्थी विपुल दीपक वाघ यांच्या नेतृत्वाखाली ३३ कलांकारांनी ही विजयी कामगीरी केली. संस्थेचे अध्यक्ष नितिन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे, डायरेक्टर डी. एन. सांगळे, प्राचार्य कैलास दरेकर, कॅम्पस ऍडमिन विजय भास्कर यांनी या संघास शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय पातळीवरील पश्चिम विभागातून प्रथम क्रमांक पटकावणारा संजीवनीचा संघ देश पातळीवरील राष्ट्रीय स्पर्धेत पश्चिम विभागाचे नेतृत्व करणार आहे. सध्या या पथकाचा कसून सराव सुरू आहे. राष्ट्रीय पातळीवर यश संपादन करण्यासाठी हा सराव सुरू आहे अशी प्रतिक्रिया विश्वस्त सुमित कोल्हे यांनी दिली.

COMMENTS