Sangamner : टोल नाक्याच्या मनमानी कारभाराविरोधात संगमनेरकर एकवटले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Sangamner : टोल नाक्याच्या मनमानी कारभाराविरोधात संगमनेरकर एकवटले

संगमनेर तालुक्यातील पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हिवरगाव पावसा टोल नाक्यावर संगमनेरकर एकवटले  आहेत. बुधवार दिनांक आठ सप्टेंबर रोज

रुणाल जरे याच्या अंगरक्षकाला दमबाजी l Rekha Jare Hatyakand l Bal Bothe I LOK News 24
अहमदनगर जिल्ह्यातील 3 लाख हेक्टरवरील पिके अडचणीत
तुमचे आजचे राशीचक्र शनिवार, २४ जुलै २०२१ l पहा LokNews24

संगमनेर तालुक्यातील पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हिवरगाव पावसा टोल नाक्यावर संगमनेरकर एकवटले  आहेत. बुधवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता टोलनाक्याच्या चालू असलेल्या मनमानी कारभाराविरोधात रस्ता रोको व ठिय्या आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्या केल्या आहेत. यामध्ये स्थानिक वाहनधारकांसाठी फास्ट ट्रॅक विरहीत स्वतंत्र लेन करणे, महामार्गावरील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवणे तसेच बंद पडलेल्या स्ट्रीट लाईट सुरू करून देणे, सर्व्हिस रस्ते दुरुस्त करणे, बनविलेले  सर्व्हिस रस्ते तात्काळ करणे, महामार्ग लगत असलेल्या गटारी पूर्ण करणे, महामार्गालगत मध्यभागी व सर्व्हिस रोड ला असलेल्या झाडांची छाटणी करणे यासह इतर विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. या आंदोलनामध्ये सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ, राजू खरात, जनार्दन आहेर, अमर कतारी, पप्पू कानकाटे, अविनाश थोरात यासह आदी उपस्थित होते.

COMMENTS