Homeताज्या बातम्याटेक्नोलॉजी

सॅमसंगचा या वर्षातील सर्वात मोठा इव्हेंट

सॅमसंग 200 मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोन लॉन्च करणार

Samsung त्याच्या Galaxy Unpacked 2023 इव्हेंटमध्ये Galaxy Book 3 सिरीज आणि नवीन Galaxy S23 सिरीजचे अनावरण करणार आहे. हा कार्यक्रम आज 1 फेब्रुवारी

शेअर बाजाराचे दिवाळीनंतर निघाले दिवाळे ; 7 लाख कोटींचा चुराडा
पुणे प्रादेशिक विभागात एकाच दिवशी दोन कोटींच्या वीजचोर्‍या उघडकीस
शेंद्रे-कागल महामार्गाच्या टोलवसुलीसाठी 53 दिवसांची मुदतवाढ

Samsung त्याच्या Galaxy Unpacked 2023 इव्हेंटमध्ये Galaxy Book 3 सिरीज आणि नवीन Galaxy S23 सिरीजचे अनावरण करणार आहे. हा कार्यक्रम आज 1 फेब्रुवारी रोजी होणार आहे. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील मेसोनिक ऑडिटोरियममध्ये हा कार्यक्रम होणार आहे. इव्हेंटमध्ये, कंपनी आपले अनेक नवीनतम उपकरणे लाँच करणार आहे.  Samsung Galaxy S23 सिरीज सॅमसंगची पुढील फ्लॅगशिप आणि टॉप स्मार्टफोन सिरीज असणार आहे. या सीरीज अंतर्गत Samsung Galaxy S23, Galaxy S23+ आणि Galaxy S23 Ultra स्मार्टफोन लॉन्च केले जातील. हे तीनही सॅमसंग फोन Android 13 आधारित One UI 5.1 सह ऑफर केले जातील. Galaxy S23 मध्ये 6.1-इंच लांबीचा फुल HD Plus AMOLED 2X डिस्प्ले मिळेल, तर Galaxy S23+ ला HDR10+ सपोर्ट आणि Gorilla Glass Victus 2 संरक्षणासह 6.6-इंचाचा डिस्प्ले मिळेल. सर्व फोन्समध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर आणि किमान 8 GB RAM सह ऑफर केले जातील. Samsung Galaxy S23 सिरीजमधील पहिल्या दोन फोनमध्ये तीन रियर कॅमेरे मिळतील, ज्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) साठी सपोर्ट असणारी प्रायमरी लेन्स 50 मेगापिक्सेलची असेल. सेकंडरी लेन्स 12 मेगापिक्सल्सची असेल, जी अल्ट्रा वाइड अँगल असेल. तिसऱ्या लेन्सला 10-मेगापिक्सलचा टेलीफोटो लेन्स मिळेल. सेल्फीसाठी फोनमध्ये 12-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. Galaxy S23 Ultra मध्ये 200-megapixel कॅमेरा मिळेल असा दावाही केला जात आहे. Galaxy S23 च्या बेस मॉडेलची किंमत 79,999 रुपये असेल, असा दावा कंपनीने केला आहे. या किंमतीत, 128 GB स्टोरेज असलेले मॉडेल 8 GB रॅमसह उपलब्ध असेल.

COMMENTS