Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत समिती सदस्य पदी संपत जाधव

सातारा / प्रतिनिधी : 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातार्‍यात होणार आहे. मसाप, शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशनच्यावतीने संमेलनाच्या नि

कराड पालिका अनुकंप प्रतिक्षा यादीतील कर्मचार्‍यांची नियुक्तीची प्रतिक्षा संपली
सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची जिल्हा माहिती कार्यालयाकडून गावोगावी प्रसिध्दी
पावसाच्या पाण्याच्या बंदोबस्तासाठी युवक राष्ट्रवादीचे भर पावसात आंदोलन

सातारा / प्रतिनिधी : 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातार्‍यात होणार आहे. मसाप, शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशनच्यावतीने संमेलनाच्या नियोजनाची तयारी स्वागताध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. संमेलनाच्या नियोजनाबाबत विविध बैठका होत आहेत. संमेलनाच्या नियोजनासाठी सक्रीय सहभाग घेऊन योगदान दिल्याबद्दल या संमेलनाच्या स्वागत समिती सदस्यपदी उद्योजक संपत राजाराम जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
संपत जाधव हे उद्योजक असून यापूर्वीही त्यांनी मसाप शाहूपुरी शाखेच्या विविध उपक्रमांना सहकार्य केले आहे. 32 वर्षानंतर सातार्‍यात होणार्‍या संमेलनासाठीही त्यांनी सक्रीय सहकार्य केले. त्यांच्या या योगदानाची दखल घेत 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत यांच्या हस्ते उद्योजक संपत जाधव यांना नियुक्तीपत्र प्रदान देण्यात आले. यावेळी 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

COMMENTS