Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समीर वानखेडेंची मुंबई उच्च न्यायालयात धाव

मुंबई : अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयने कारवाई केली आहे. याप

कारवाई करताना उपस्थित असलेला दाढीवाला आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया वानखेडेंचा मित्र… मलिकांचा दावा
समीर वानखेडेंनी माझ्या मुलीचा सीडीआर मागितला… नवाब मलिक भडकले… (Video)
समीर वानखेडे आमचा जावई नाही – चंद्रकांत पाटील (Video)

मुंबई : अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयने कारवाई केली आहे. याप्रकरणी समीर वानखेडे यांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात धावा घेतली आहे. यासदंर्भातील याचिकेत वानखेडेंनी अनेक धक्कादायक दावे केले आहेत. समीर वानखेडेंची मागणी हायकोर्टाकडून मान्य झाली असून विधिज्ञ रिझवान मर्चंट, आबाद पोंडा समीर वानखेडे यांची बाजू मांडणार आहेत.
अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याबद्दल विशेष चौकशी समितीने अनेक खुलासे केले आहेत. एनसीबीचे अधिकारी ज्ञानेश्‍वर सिंह यांच्या नेतृत्त्वाखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अडकवू नये म्हणून शाहरुख खानकडून 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी वानखेडेंविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तपासादरम्यान समितीचा अहवाल आला आहे. समीर वानखेडे यांनी 2017 ते 2021 दरम्यान 6 परदेशी दौरे केले आहेत. यामध्ये यूके, आयर्लंड, पोर्तुगाल, दक्षिण आफ्रिका आणि मालदीव या देशांचा समावेश आहे समावेश आहे. या परदेश दौर्‍यांसाठी समीर वानखेडे यांनी 8.75  लाखांचा खर्च दाखवला आहे, जो वास्तविक खर्चापेक्षा खूपच कमी आहे. लंडनच्या 19 दिवसांच्या सहलीसाठी, वानखेडेने यांनी एक लाखांचाच खर्च दाखवला होता. तर, तिथे ते एका नातेवाईकाकडे राहिले होते, असे दाखवण्यात आले आहे. वानखेडे यांनी 17 लाख 40 हजार रुपयांना रोलेक्स गोल्ड घड्याळ खरेदी केले. परंतु, या घड्याळ्याची मूळ किंमत 22 लाख 5 हजार आहे. एवढंच नव्हे तर वानखेडे यांचे मुंबईत 4  फ्लॅट असल्याचा दावाही दक्षता अहवालात करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे आहे. तसंच, मुंबईत त्यांच्या नावे 6 मालमत्ता असून ते वडिलोपार्जित मालमत्ता आहेत, असेही अहवालातून स्पष्ट झाले आहे. यासंदर्भातील बातम्या प्रकाशित झाल्यानंतर आज, शुक्रवारी वानखेडेंनी हायकोर्टात धाव घेत सीबीआयच्या कारवाईवर आक्षेप नोंदवला आहे. सोबतच वानखेडेंनी अनेक खुलासावजा दावे देखील केले आहेत.

COMMENTS