Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लेखी आश्वासनानंतर संभाजी ब्रिगेडचे आंदोलन मागे

श्रीगोंदा :  तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांबाबत संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात येणारे प्रतीकात्मक दशक्रिया आंदोलन प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. संबंधित कामांबाबत ठोस कार्यवाही करण्याचे आश्वासन तहसील प्रशासनाकडून देण्यात आले. एम.एस.आय.डी.सी.  या एजन्सीमार्फत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला होता. वारंवार निवेदने देऊनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. सोमवारी (दि. ९) तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरु असताना तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून कामाची गुणवत्ता सुधारण्यात येईल, दोषी ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल तसेच तात्काळ काम सुरू करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि विकासकामांच्या गुणवत्तेसाठी हा लढा सुरूच राहील, असा इशाराही देण्यात आला. लेखी आश्वासनानंतर शांततेच्या मार्गाने आंदोलन मागे घेण्यात आले.

श्रीगोंदा शहरातील रस्त्याचे काम पूर्ण करा – संभाजी ब्रिगेडची मागणी
Pune : ‘महाराष्ट्र बंद’ ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा… (Video)
संभाजी ब्रिगेडच्या वतीने बळी महोत्सवाचे आयोजन

श्रीगोंदा :  तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांबाबत संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात येणारे प्रतीकात्मक दशक्रिया आंदोलन प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. संबंधित कामांबाबत ठोस कार्यवाही करण्याचे आश्वासन तहसील प्रशासनाकडून देण्यात आले.

एम.एस.आय.डी.सी.  या एजन्सीमार्फत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला होता. वारंवार निवेदने देऊनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.

सोमवारी (दि. ९) तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरु असताना तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून कामाची गुणवत्ता सुधारण्यात येईल, दोषी ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल तसेच तात्काळ काम सुरू करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले.

यावेळी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि विकासकामांच्या गुणवत्तेसाठी हा लढा सुरूच राहील, असा इशाराही देण्यात आला. लेखी आश्वासनानंतर शांततेच्या मार्गाने आंदोलन मागे घेण्यात आले.

COMMENTS