अहिल्यानगर (प्रतिनिधी) :- सकल ब्राह्मण समाजसेवा संस्था अहिल्यानगर च्यावतीने २७ ते ३० एप्रिल या कालावधीत प्रभू परशुराम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन क
अहिल्यानगर (प्रतिनिधी) :- सकल ब्राह्मण समाजसेवा संस्था अहिल्यानगर च्यावतीने २७ ते ३० एप्रिल या कालावधीत प्रभू परशुराम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राजाभाऊ पोतदार व विजय देशपांडे यांनी दिली.
दि. २७ एप्रिल रोजी सकाळी १० ते २ यावेळेत प्रकाश नेत्रालय, डौले हॉस्पिटल शेजारी सावेडी रोड, अहिल्यानगर येथे डॉ. राजू चीट गोपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. अमित बडवे यांच्या शुभहस्ते नेत्ररोग तपासणी शिबिर व नेत्रदान नाव नोंदणी शिबिर होणार आहे. सोमवार दि. २८ एप्रिल रोजी सकाळी १० ते २ यावेळेत जनकल्याण रक्तपेढी, गाडगीळ पटांगण, नालेगाव, अहिल्यानगर येथे कै. सौ. सुशीला कृष्णाजी देशपांडे यांच्या स्मृती प्रित्यर्थी मकरंद देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली व आदिनाथ दहिफळे यांच्या शुभस्ते रक्तदान शिबिर होणार आहे. मंगळवार दि. २९ एप्रिल रोजी सकाळी ७ ते दुपारी १२ यावेळेत ऋग्वेद भवन चितळे रोड, अहिल्यानगर येथे प्रधान आचार्य वेद शास्त्र संपन्न श्री सिद्धेश्वर निसळ यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर मधील २१ नवविवाहीत ब्राम्हण वाढूवरणच्या शुभहस्ते भव्य श्री परशुराम महायाग होणार आहे. दुपारी १ ते ३ यावेळे ऋग्वेद भवन, चितळे रोड, अहिल्यानगर येथे श्री राजाभाऊ जोशी यांच्या सौजन्याने (बन्सी महाराज मिठाईवाले) महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.
COMMENTS