बीड(प्रतिनिधी)- येथील देवगिरी प्रतिष्ठान,बीड आयोजित साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धचे उद्घ
बीड(प्रतिनिधी)- येथील देवगिरी प्रतिष्ठान,बीड आयोजित साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धचे उद्घाटन सदस्य सचिव साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशने समिती महाराष्ट्र शासन प्रा.डॉ. संजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा देवगिरी प्रतिष्ठान,बीडचे संस्थापक अध्यक्ष प्रा.प्रदीप रोडे यांची उपस्थिती होती तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उत्तम पवार (अध्यक्ष अण्णाभाऊ साठे शिक्षण प्रसारक मंडळ,बीड), प्रा. राम गायकवाड (अध्यक्ष मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,बीड), प्राचार्य डॉ. पांडुरंग सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रस्ताविकात प्रा.डी.जी. निकाळजे यांनी उपस्थितांचे स्वागत करून साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा घेण्या मागील उद्देश स्पष्ट केला.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ.संजय शिंदे म्हणाले की, वक्तृत्व स्पर्धा मोठ्या प्रमाणात घेतल्या गेल्या पाहिजेत आणि विद्यार्थ्यांनी देखील अशा स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला पाहिजे. वक्तृत्व स्पर्धेमुळे नेतृत्व गुणाचा विकास होतो असे प्रतिपादन शिंदे यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.प्रदीप रोडे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना वक्तृत्व स्पर्धेमुळे महापुरुषांच्या विचारधारेची शिदोरी मिळते असे मत व्यक्त केले. महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांच्या मार्फत जनमानसात पोहचले गेले पाहिजे असे त्यांनी सांगितले. या स्पर्धेमध्ये अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील समाजदर्शन, आंबेडकरी चळवळीची सद्यस्तिथी आणि दिशा, वर्तमान फुले-शाहू-आंबेडकर विचारांची प्रासंगिकता असे विषय दिलेले होते. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्राचार्य डॉ.पांडुरंग सुतार, प्रा.शरद सदाफुले, प्रा.लक्ष्मण गुंजाळ यांनी काम पाहिले. वक्तृत्व स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून एकूण 44 स्पर्धक सहभागी झाले होते.यामध्ये शाहू महाविद्यालय लातूर ची कु. प्रतीक्षा मोरे हिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे, द्वितीय क्रमांक शिवराज महाविद्यालय गडहिंग्लज चा संकेत पाटील तर तृतीय क्रमांक बलभीम महाविद्यालय,बीड चा रोहन चव्हाण याने पटकाविला आहे. उत्तेजनार्थ पारितोषिक दत्ता घुगे, ऐश्वर्या तनपुरे, शोएब आत्तार यांनी पटकावली.
वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला निवृत्त उपसंचालक औरंगाबाद मा.सुधाकर बनटे यांची उपस्थिती होती त्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली. याप्रसंगी प्रा.प्रदीप रोडे, प्रो.डॉ.प्रेमचंद सिरसाट, प्राचार्य प्रो.डॉ. लंकेश्वर थोरात हे उपस्थित होते. प्रा.अंकुश कोरडे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. योगिता लांडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी समन्वयक संजय धुरंधरे, प्रा.प्रकाश गायकवाड,प्रा.राहुल सोनवणे,प्रा.अमर ससाणे, प्रा.प्रकाश ढोकणे, प्रा.हनुमंत विद्यागर,प्रा.डॉ.विकास वाघमारे,प्रा.सुरेश कसबे,प्रा.किशोर वाघमारे, रोहित जोगदंड, विजय नागरगोजे यांनी परिश्रम घेतले.याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS