मुंबई ः आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी कायम चर्चेत राहणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना बुधवारी सहकार खात्याने चांगलाच दणका दिला आहे. सदावर्ते यांच

मुंबई ः आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी कायम चर्चेत राहणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना बुधवारी सहकार खात्याने चांगलाच दणका दिला आहे. सदावर्ते यांच्यासह त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांची एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या तज्ज्ञ संचालकपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सहकार आयुक्तांकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
सहकार विभागाच्या या निर्णयामुळे सदावर्ते दाम्पत्य आता एसटी बँकेवर तज्ज्ञ संचालक म्हणून कामकाज करू शकणार नाही. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांच्या तक्रारीनुसार, 4 ऑक्टोबर 2023 मध्ये सदावर्ते पॅनलच्या संचालकांनी यवतमाळ येथे बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावली होती. या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी सर्व सभासदांना अहवालाचे वाटप करण्यात आले नव्हते. त्यावर नथुराम गोडसे यांचे फोटो प्रिंट करण्यात आले होते. तसे पाहता, एसटी बँक, एसटी कर्मचारी यांचा या राजकारणाशी काहीही संबंध नव्हता. वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यापूर्वी सर्व सभासदांना 14 दिवसआधी सभेची सूचना देणे आवश्यक होते. परंतु अशा कुठल्याही सूचना या संचालक मंडळाकडून देण्यात आल्या नव्हत्या. दरम्यान, सदावर्ते यांच्या पॅनलने आपल्या मर्जीतील सभासद बोलवून, हवे त्या विषयांना मंजुरी मिळवून घेण्याचा प्रयत्न केला, अशा प्रकारच्या एकूण 13 बेकायदेशीर विषयांची तक्रार श्री संदीप शिंदे यांनी सहकार खात्याकडे केली होती. यातील बहूसंख्य विषयांना स्थगिती देण्यात आली आहे. तसेच सदावर्तेंनी नियम मोडल्याचे निरीक्षण नोंदवत सहकार विभागाने दोघांवर ही कारवाई केली.
COMMENTS