Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संतसाहित्य आणि तीर्थस्थळे ही मानवी जीवनाची अमृतस्थळे

संत साहित्याचे अभ्यासक डॉ. बाबुराव उपाध्ये यांचे प्रतिपादन

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः भारत ही जगातील सर्वात पवित्र आणि जीवनदायी भूमी आहे. भारतातील संतसाहित्य आणि विविध पूजनीय तीर्थस्थळे ही मानवी जीवनाला लाभले

कृष्णानंद महाराजांचा बाल अनाथाश्रम मानवसेवेचे तीर्थक्षेत्र ः डॉ. बाबुराव उपाध्ये
प्राचार्य डॉ.गावित यांनी मराठी संशोधन विभागाला उपक्रमशील गुणवत्ता दिली ः डॉ. बाबुराव उपाध्ये
दुर्गामातांचा डॉ. महांडुळे यांनी केलेला सन्मान स्त्रीशक्तीचा उत्सव ः डॉ. बाबुराव उपाध्ये

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः भारत ही जगातील सर्वात पवित्र आणि जीवनदायी भूमी आहे. भारतातील संतसाहित्य आणि विविध पूजनीय तीर्थस्थळे ही मानवी जीवनाला लाभलेली अमृतस्थळे असून त्यांचे वाचन आणि दर्शन ही समाधानाची पर्वणी होय असे मत संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
येथील विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे सुखदेव सुकळे यांनी संपादित केलेल्या ’उसगावचा संतमहिमा ’पुस्तकावरील परिसंवाद आणि भारतीय तीर्थस्थळ दर्शन करून आलेले संजय बुरकुले व सुरेखा बुरकुले यांचा अभिष्टचिंतन सोहळा अनुभवमनोगते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते.अध्यक्षस्थानी डी. डी. काचोळे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील साळवे होते.विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक,सचिव  संयोजक सुखदेव सुकळे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक करून मान्यवर पाहुण्यांचा सत्कार केले.ते म्हणाले,साधुसंत येता घरी, तोची दिवाळी दसरा, याप्रमाणे डॉ. बाबुराव उपाध्ये, मुख्याध्यापक सुनील साळवे ह्यांनी सदैव रंजल्यागांजल्याची सेवा करण्यातच धन्यता मानले, त्यांची उपस्थितीत ’उसगावचा संतमहिमा ’पुस्तकावर परिसंवाद आणि सन्मान सोहळा ह जीवनदायी ठरणारे आहे.संजय बुरकुले, सुरेखा बुरकुले, प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये, मुख्याध्यापक सुनील साळवे, प्रा.अशोकराव तुसे,सुरेश बुरकुले यांचे बुके, बुक, शाल आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आले.डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी आपल्या मनोगतात पुढे सांगितले की, भारत म्हणजे जगाची जीवनजननी आहे, ही भूमी सुजलाम, सुफलाम आहे, अनेक तीर्थस्थळे, अनेक ऋषी, मुनी,संत, समाजसेवक ही आपली शक्ती व भक्तिस्थळे आहेत. त्यांचे चिंतन, दर्शन ही जीवनाला जगण्याचा अर्थ सांगते. सुखदेव सुकळे यांनी उसगावचा संतमहिमा सांगून प्रेरणादायी वाचनवाट निर्माण केली. संजय बुरकुले, सौ.सुरेखा बुरकुले,सौ. आशा सुनील ओझर्डे, सुनील ओझर्डे, रघुअप्पा ाकोरे, गणेश डाकोरे, सीमा डाकोरे इत्यादींनी काशीएश्‍वेश्‍वर, हरिद्वार,  अयोध्या, प्रयागराज, बद्रीनाथ इत्यादी दोन धामाची तीर्थस्थळेदर्शन, साबरमती आश्रमासह उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र दर्शन घेतले ह त्यांचे अनुभव अनेकानेकांना प्रेरणा देतील, असे सांगून सर्वांचे अभिनंदन केले. मुख्याध्यापक सुनील साळवे यांनी बुरकुले परिवार, सुकळे परिवार, वाडणकर परिवार यांनी शिक्षण, साहित्य आणि सामाजिक उपक्रमातून आदर्श निर्माण केला आहे. संजय बुरकुले एक प्रामाणिक रयतनिष्ठ सेवक आहेत. सुखदेव सुकळे ह सर्वांचे आधारवड असल्याबद्दल कौतुक केले. यावेळी ह.भ.प. बालब्रह्मचारी बाळकृष्ण महाराज यांच्या अनाथालयासाठी एकवीसशे रुपये चेक देऊन महाराजांचा सत्कार केला. सुलोचना तुसे, कावेरी इनामके,राजेंद्र इनामके, सुनीता बुरकुले, अर्चना बुरकुले, तेजस्वी बुरकुले, संकेत बुरकुले, सुयोग बुरकुले, डॉ. दिलीप शेजवळ, मुख्याध्यापक रंगनाथ माने, मुख्याध्यापक मानेसह काचोळे विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका यांनी बुरकुले, सुकळे परिवाराचा सन्मान केला. स्नेहभोजनानंतर सुखदेव सुकळे यांनी सूत्रसंचालन करीत आभार मानले.

COMMENTS