Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अल अमीन उर्दू हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

नेवासाफाटा/प्रतिनिधी ः शंभर टक्के निकालाची परंपरा जपणार्‍या नेवासा येथील माजी जिल्हा परिषद सदस्य महंमदभाई आतार यांनी सुरू केलेल्या अल अमीन उर्दू

पक्ष सोडण्याच्या चर्चेला घुलेंच्या मेळाव्यात पूर्णविराम
ठिबक सिंचनासाठी कर्जत तालुक्याला राज्यात सर्वाधिक आर्थिक लक्षांक- आ.रोहित पवार
सिव्हील जळीतकांड प्रकरणी चार महिलांना झाली अटक

नेवासाफाटा/प्रतिनिधी ः शंभर टक्के निकालाची परंपरा जपणार्‍या नेवासा येथील माजी जिल्हा परिषद सदस्य महंमदभाई आतार यांनी सुरू केलेल्या अल अमीन उर्दू हायस्कूल मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सन्मानपत्र ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. यावेळी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अल अमीन उर्दू हायस्कूलच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संस्थापक  अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य महंमदभाई आतार यांच्या हस्ते ध्वजपूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी शाळेतील विद्यार्थीनींनी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे देशभक्तीपर गीते व नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. इयत्ता 10वी मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना अँड. यूनुस पठाण व सलीमभाई शेख यांच्या हस्ते सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी अल अमीन उर्दू हायस्कूल शिक्षण संस्थेचे सचिव मौलाना काझी ईब्तेहाजोद्दीन अलीमसाब, नगरसेवक व संचालक फारूकभाई आतार, राजमोहम्मद  शेख, जलाल चौधरी, अन्सार बगवान, हुसेनभाई बागवान, नदीम शेख शाळेचे शिक्षक अन्सार पठाण, आरेफा माहिमूद पठाण, फारूकी मो.जुनेद, काझी निहाल, शिक्षकेतर कर्मचारी वाहजिद्दीन काझी, रुबीना शेख, जुबेर आतार, सिराजोद्दीन काझी, इम्रान मोहम्मद आतार यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS