Homeताज्या बातम्याक्रीडा

रोहित शर्माचे वादळी शतक

रोहित शर्माचे वादळी शतक

नवी दिल्ली प्रतिनिधी - रोहित शर्माचे वादळी शतक आणि विराट कोहलीचा फिनिशिंग टच, या जोरावर भारताने अफगाणिस्तानचा 8 विकेट आणि 15 षटके राखून पराभव

आरआयटीच्या ऋतुराज पाटीलची शिवाजी विद्यापीठ संघामध्ये निवड
दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने पुन्हा एकदा प्रतिष्ठेचा बॅलोन डी’ओर पुरस्कार जिंकला
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या वडिलांचे निधन

नवी दिल्ली प्रतिनिधी – रोहित शर्माचे वादळी शतक आणि विराट कोहलीचा फिनिशिंग टच, या जोरावर भारताने अफगाणिस्तानचा 8 विकेट आणि 15 षटके राखून पराभव केला. अफगाणिस्तानने दिलेले 273 धावांचे आव्हान भारताने दोन विकेट आणि 35 षटकांमध्ये सहज पार केले. भारताचा विश्वचषकातील हा सलग दुसरा विजय होय. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभ केला होता. आज अफगाण संघाविरोधात बाजी मारली. भारताचा पुढील सामना 14 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरोधात अहमदाबाद येथे होणार आहे. 

भारताच्या रोहित शर्मानं कर्णधारास साजेशी खेळी उभारून अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात शतक साजरं केलं आहे. या सामन्यात अफगाणिस्ताननं भारताला विजयासाठी 273 धावांचं आव्हान दिलं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मानं ईशान किशनच्या साथीनं भारताला शतकी सलामी दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात रोहितला भोपळाही फोडता आला नव्हता. त्या अपयशाची त्यानं आज अफगाणिस्तानविरुद्ध शतकानं भरपाई केली. रोहित शर्माचं वन डे कारकीर्दीतलं हे 31 वं आणि विश्वचषकातलं सातवं शतक ठरलं. त्याच्या 63 चेंडूंमधल्या शतकाला 12 चौकार आणि चार षटकारांचा साज आहे. 

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमच्या सपाट खेळपट्टीवर भारताच्या गोलंदाजांनी अफगाणिस्तानला 272 धावांत रोखले. त्यानंतर रोहित शर्मा याने वादळी फलंदाजी करत हे आव्हान सहज पार करण्यास सिंहाचा वाटा उचलला. 273 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी वादळी सुरुवात केली. विशेषकरुन रोहित शर्मा याने धावांचा पाऊस पाडला. रोहितपुढे अफगाणिस्तानची गोलंदाजी अतिशय दुबळी आणि कमकुवत जाणवत होती. रोहितच्या वादळात अफगाणिस्तानचे सर्वाच गोलंदाज उडून गेले.  रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी अवघ्या 18.4 षटकात 156 धावांची सलामी दिली. दोघांनीही अफगाण गोलंदाजांचा समाचार घेतला. 

सर्वाधिक शतकांचा विक्रम रोहितच्या नावावर – विश्वचषकात सर्वाधिक शतक ठोकणारा फलंदाज म्हणून आता रोहित शर्माच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. रोहित शर्माने विश्वचषकातील सातवे शतक ठोकले. याआधी हा विक्रम सचिनच्या नावावर होता. सचिन तेंडुलकरने विश्वचषकात सहा शतके ठोकली आहेत. सर्वाधिक शतकांच्या बाबतीत आता सचिन तेंडुलकर दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा कुमार संगाकारा आणि ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग आहेत. दोघांच्या नावावर विश्वचषकात 5 शतके आहेत. ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. वॉर्नरने चार शतके ठोकली आहे. भारतीय कर्णधार सौरव गांगुलीही चार शतकासह पाचव्या क्रमांकावर आहे.

COMMENTS