Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आंबीजळगावात मध्यरात्री दरोडेखोरांचा धुमाकूळ; दोन घरांवर दरोडा, ५८ हजारांचा ऐवज लंपास

कर्जत : तालुक्यातील आंबीजळगाव येथे मध्यरात्री दरोडेखोरांच्या टोळीने धाडसी दरोडा टाकत घरातील सदस्यांना मारहाण करून रोख रक्कम व दागिन्यांसह सुमारे

रमजाननिमित्त खजूर वाटप; सर्वधर्म समभावाचा संदेश
पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्लाचौघांसह ११ अनोळखी इसमांवर गुन्हा
महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे : डॉ. प्रतिभा पाचपुते

कर्जत : तालुक्यातील आंबीजळगाव येथे मध्यरात्री दरोडेखोरांच्या टोळीने धाडसी दरोडा टाकत घरातील सदस्यांना मारहाण करून रोख रक्कम व दागिन्यांसह सुमारे ५८ हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे या टोळीने त्याच रात्री परिसरातील रासकर वस्तीवरही घरफोडी केल्याची माहिती समोर आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत संपत दत्तू अनारसे (वय ५०, रा. आंबीजळगाव, ता. कर्जत) यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. १५ मार्च रोजी रात्री कुटुंबीय जेवण करून घराच्या पडवीत झोपले असताना पहाटे सुमारे १ वाजण्याच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी मारहाण करून चाकूचा धाक दाखवून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील सदस्यांना धमकावत व मारहाण करत कपाटे आणि पिशव्या तपासून मौल्यवान वस्तू हिसकावून घेतल्या.

फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, घरात घुसलेले ८ ते ९ जण अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील होते. काही जणांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते व चेहऱ्यावर रुमाल बांधले होते. दोन जण अंगाने जाडसर होते तर काही मध्यम बांध्याचे होते. काहींच्या हातात लाकडी दांडे व धारदार शस्त्रे असल्याचेही सांगण्यात आले आहे. या टोळीने घरातील सदस्यांना धमकावत मारहाण करून लुटमार केली. फिर्यादी यांच्या पत्नी व आई यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरट्यांनी ओरबडून नेले. जाताना आरडा ओरड करू नका व कोणाला काही सांगू नका अन्यथा परत येऊन ठार मारू असा दम देखील दिला.

या घटनेत सुमारे ४५ हजार रुपयांचे मंगळसूत्र, चांदीचे दागिने, मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण ५८ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, या टोळीने याच रात्री परिसरातील रासकर वस्तीवरही घरफोडी केल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी त्या दिशेनेही तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर ठसे तज्ञ व श्वान पथक घटनास्थळी आले होते त्यांनी काही अंतरावर माग काढला

या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सोपान  शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS