Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्पीड ब्रेकर व माहिती फलक लावण्यासाठी रस्ता रोको आंदोलन

राहुरी/प्रतिनिधीः राहुरी-शिंगणापूर रस्त्यावर वाढत्या अपघाताच्या मालिकांमुळे बळींची संख्या लक्षात घेता या रस्त्यावर तात्काळ स्पीड ब्रेकर व माहिती

तुमचे आजचे राशीचक्र बुधवार, ०९ जून २०२१ l पहा LokNews24
करंजी शाळेतील विद्यार्थ्यांनी केली उन्हाळ्यात पक्षांना पाण्याची आणि अन्नाची सोय
राष्ट्रवादी चित्रपट, कला, साहित्य व सांस्कृतिक सेलच्या जिल्हा सरचिटणीसपदी रियाज पठाण

राहुरी/प्रतिनिधीः राहुरी-शिंगणापूर रस्त्यावर वाढत्या अपघाताच्या मालिकांमुळे बळींची संख्या लक्षात घेता या रस्त्यावर तात्काळ स्पीड ब्रेकर व माहिती फलक लावण्यासाठी माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली उंबरे येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले .
                 शनिशिंगणापूर-राहुरी रस्त्यावर वाढत्या अपघातात वाढलेल्या बळी मुळे रस्त्यावर डिव्हायडर पाहिजे. रिफ्लेक्टरची आवश्यकता आहे.राहुरी तालुक्याचे विद्यमान आमदार माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी रस्ता रोको आंदोलन करून सरकारचे याकडे लक्ष वेधले . या  रस्त्यावर सात ते आठ गाव आहेत. कोठेही दिशादर्शक व माहितीदर्शक फलक नाहीत. गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर अपघात वाढले असून राहुरीतील नागरिकांचा यामुळे बळी जात आहे. बाहेरील भक्तांची वाहने या रस्त्याने जात असल्याने दिशादर्शक व माहिती फलक नसल्याने वेगाचा अंदाज न आल्याने अनेक अपघात यापूवी झालेले आहे . या रस्त्यावर प्रत्येक गावात स्पीड ब्रेकर रिफ्लेक्टर व माहिती फलक लावावे अशी मागणी माजीमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले .यावेळी बाबासाहेब भिटे, सुनील अडसुरे, आदींची भाषणे झाली . रस्ता रोकोमुळे दोन्ही बाजूने भाविकांच्या व प्रवाशांच्या वाहनांच्या दूरवर रांगाच रांगा लागलेल्या दिसुन येत होत्या.

COMMENTS