सधन व्यक्तींनी अन्नसुरक्षा योजनेतून बाहेर पडावे : तहसीलदार पाटील

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सधन व्यक्तींनी अन्नसुरक्षा योजनेतून बाहेर पडावे : तहसीलदार पाटील

श्रीरामपूर/प्रतिनिधी : शासनावर येणारा आर्थिक भार कमी होण्याच्या दृष्टीने तसेच योग्य व गरजु लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात अन्नधान्याचा लाभ मिळावा या कर

कोपरगाव शहरातील शिबिरात 135 रुग्णांची तपासणी
विठू नामाच्या गजरात धार्मिक व सामाजिक उपक्रम उत्साहात
शिक्षकांच्या सभेत गोंधळ…धक्काबुक्की व तोडफोड

श्रीरामपूर/प्रतिनिधी : शासनावर येणारा आर्थिक भार कमी होण्याच्या दृष्टीने तसेच योग्य व गरजु लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात अन्नधान्याचा लाभ मिळावा या करीता सधन व्यक्तीनी अनुदानातुन बाहेर पडावे असे अवाहन श्रीरामपुरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे. शासनाने गरजु व्यक्तीना कमी दरात अन्नधान्य उपलब्ध करुन दिले असून आजही बरेच लाभार्थी शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेपासुन दूर आहे गाव व शहर निहाय ठरवुन दिलेला ईष्टांक पुर्ण झाल्यामुळे गरजुंना लाभ देणे शक्य होत नाही.
अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेणार्‍या व्यक्तीचे कालांतराने उत्पन्न वाढले असेल तर त्यांनी या योजनेतुन बाहेर पडावे आपण असे केल्याने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्य देण्याकरीता शासनावर येणारा आर्थिक भार कमी होणार आहे आपण आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे त्या निमित्ताने कुटुंब प्रमुख किंवा कुटुंबातील व्यक्ती शासकीय निमशासकीय स्तरावर नोकरी करत असेल कुणी व्यापारी उद्योजक असाल आपले उत्पन्न वाढलेले असेल आपण सधन असाल तर आपण स्वताःहुन अन्नधान्याचा लाभ सोडावा .आपले आधार कार्ड सर्व ठिकाणी लिंक करण्यात आलेले आहे त्यामुळे कुणीही आपले उत्पन्न लपविण्याचा प्रयत्न करु नये. सधन व्यक्तीनी स्वेच्छेने अनुदानाचा लाभ सोडावा या करीता असणारा फाँर्म संबधीत स्वस्त धान्य दुकानदार श्रीरामपुर तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग झेराँक्स सेंटर यांच्याकडे उपलब्ध आहेत. शहरी भागाकरीता 59 हजार रुपये व ग्रामीण भागाकरीता 44 हजार रुपये उत्पन्नाची अट ठेवण्यात आलेली असुन या पेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या सधन व्यक्तींनी धान्याचा लाभ सोडावा असे आवाहन तहसीलदार पाटील यांनी केले आहे.

COMMENTS