कोलकाता ः कोलकाता बलात्कार पीडितेची ओळख उघड करणे आणि तसेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करणे एका विद्यार्थीनीला महा

कोलकाता ः कोलकाता बलात्कार पीडितेची ओळख उघड करणे आणि तसेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करणे एका विद्यार्थीनीला महागात पडले असून, तिला अटक करण्यात आले आहे. किर्ती शर्मा असं या विद्यार्थिनीचे नाव असून कोलकाता पोलिसांनी ही कारवाई केली. कोलकाता येथे राहणार्या किर्ती शर्मा या विद्यार्थिनीने बलात्कार हत्या प्रकरणाशी संबंधित तीन इंस्टाग्राम पोस्ट शेअर केल्या होत्या, त्यापैकी एका पोस्टमध्ये तिने पीडित डॉक्टर तरुणीचा फोटो वापरत तिची ओळख उघड केली होती. अशा प्रकारे बलात्कार पीडितेची ओळख उघड करणे हा कायद्याने गुन्हा असल्याचे तिच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तिला तिच्या लेक टाऊन येथील घरातून अटक केली आहे. या विद्यार्थीनीने इतर दोन इंस्टाग्राम पोस्टमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधातही आक्षेपार्ह टीप्पणी केली होती. तसेच तीने केलेल्या दोन्ही पोस्ट या भडकावू स्वरुपाच्या होत्या. या पोस्टमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता होती, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
COMMENTS