Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेवणनाथ महाराज म्हणजे चिरंजीव ऊर्जा

आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज यांचे प्रतिपादन

श्रीरामपूर ः शाक्त पंथ, नाथ पंथ आणि भक्ती संप्रदाय यांचा त्रिवेणी संगम म्हणजे मौनयोगी रेवणनाथ महाराज होते. त्यांचे अलौकिक कार्य म्हणजे आपल्या साठी कध

त्या अपात्र संचालकांनी रिझर्व्ह बँकेला डिवचले…
देवेंद्र फडणवीस सर्वसामान्यांसाठी लढणारा कोरोना योद्धा :माजी मंत्री शंकरराव कोल्हे
मेंढपाळांना पिस्तुल व परवाना द्या ; संघर्ष समितीच्या शेंडगेंची मागणी

श्रीरामपूर ः शाक्त पंथ, नाथ पंथ आणि भक्ती संप्रदाय यांचा त्रिवेणी संगम म्हणजे मौनयोगी रेवणनाथ महाराज होते. त्यांचे अलौकिक कार्य म्हणजे आपल्या साठी कधीही न संपणारी चिरंजीव ऊर्जा आहे असे प्रतिपादन आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज यांनी केले आहे. वडाळा महादेव येथील श्रीक्षेत्र रेणुका देवी आश्रमात आयोजित प्रथम पुण्यतिथी सोहळा निमित्ताने आयोजित किर्तन प्रसंगी ते बोलत होते.
  यावेळी सावरगाव (येवला) येथील बापू गुरूजी कुलकर्णी, मोहनशास्त्री खानविलकर, अनंतशास्त्री लावर, दत्तोपंत भालेराव महाराज,विश्‍वंभर महाराज, बहिरट  महाराज, शिंदे महाराज, हनुमान भक्त बाळकृष्ण महाराज, सतिश मुळे, साधनाताई मुळे आदी उपस्थित होते. यावेळी महाराजांनी संत एकनाथ महाराज यांचा पूर्व पुण्य असता गाठी, संत भेटी तरी होय, धन्य धन्य संत संग, फिटे पांग जन्माचाया अभंगावर निरुपम केले.वैदिक आणि वारकरी परंपरा तसेच नाथ परंपरा व विविध संप्रदाय हे कसे व्यापक आहे त्याचे विश्‍लेषण केले. त्यांना गायनाचार्य किरण महाराज, रावसाहेब महाराज, तुकाराम महाराज, संवादिनी भालेराव महाराज, पखवाज परमेश्‍वर महाराज भारत यांनी व हनुमान भजनी मंडळ यांनी साथसंगत केली. प्रारंभी सकाळी राजराजेश्‍वरी रेणुका देवी महापूजा करण्यात आली. त्यानंतर सद्गुरू चरण पादुका प्रतिष्ठा झाली, यजमान रमेश गावंडे(अमरावती) होते पौरोहित्य सुधीर गुरूजी कुलकर्णी यांनी केले. यावेळी गुरुप्रसाद देशपांडे संपादितनेवासा दर्शन चा सद्गुरू विशेषांक प्रकाशित करण्यात आला.महाराष्ट राज्य कबड्डी संघात निवडीबद्दल सौरभ चंद्रशेखर राऊत व चैतन्य भूषण पुरस्काराबद्दल ओंकार कुलकर्णी यांचा गौरव करण्यात आला. अविनाश गणोरकर दाम्पत्य तसेच डॉ. सौ. वर्षा शिरसाठ यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. सौ तेजस्विनी पोहेकर व स्नेहल पोहेकर यांनी सद्गुरू कवण सादर केले.महाप्रसादाने पुण्यतिथी महोत्सव सांगता झाली. सोहळा यशस्वीतेसाठी सद्गुरू शिष्य परिवाराने परिश्रम घेतले.यावेळी सद्गुरू बाबांचा महाराष्ट्रातील अनुग्रहीत शिष्य परिवार तसेच पंचक्रोशीतील भाविकांची मोठी उपस्थिती होती. 

COMMENTS