Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पावणेदोन लाखाची लाच घेतांना वकील एसीबीच्या जाळ्यात

गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली होती पाच लाखाची लाच

पुणे ः एका 25 वर्षीय तरुणीवर आणि तिच्या दोन मित्रांवर गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच पोलिसां सोबत तडजोड करतोय असे सांगून एका वकीलाने पाच लाख रुपया

मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण हवे
खुल्या दफनभूमी मध्ये केला कोरोना बाधित व्यक्तीचा मृतदेह दफन | ‘आपलं नगर’ | LokNews24
मुंबईकरांच्या मालमत्ता करात होणार वाढ?

पुणे ः एका 25 वर्षीय तरुणीवर आणि तिच्या दोन मित्रांवर गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच पोलिसां सोबत तडजोड करतोय असे सांगून एका वकीलाने पाच लाख रुपयांची लाचेची मागणी केली. परंतु याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून लाचखोर वकीलास पावणेदोन लाख रुपयांची लाच घेवून उर्वरित 3 लाख 50 हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी आरोपी वकीलास अटक केली आहे. सुमित नामदेवराव गायकवाड (वय-25, रा.आंबेगाव पठार, पुणे) असे याप्रकरणी कारवाई करण्यात आलेल्या आरोपी वकीलाचे नाव आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणीच्या व्यक्तीगत अडचणीमुळे पोलिसांनी तक्रारदार व त्यांचे दोन मित्रांना शास्त्रीनगर पोलिस चौकी, कोथरुड येथे घेऊन गेले होते. त्यानंतर तक्रारदार व तिच्या मित्राचे ओळखीचे वकील सुमीत गायकवाड याने तक्रारदार याचेवर व दोन्ही मित्रांवर गुन्हा न करण्यासाठी तसेच पोलिसां सोबत तडजोड करतोय असे सांगून पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर खाजगी वकील सुमीत गायकवाड याने तक्रारदार यांचेकडून एक लाख रुपये व त्यांचे मित्रांकडून फोन पे द्वारे 55 हजार रुपये असे एकूण एक लाख 55 हजार रुपये घेतले होते. त्यानंतर उर्वरित रक्कम देत नाही तोपर्यंत तक्रारदार हिचे विरुध्द असलेला पुरावा मी नष्ट करणार नाही असे सांगून आणखी तीन लाख 50 हजार रुपयांची मागणी करण्यात येत होती. परंतु तक्रारदार यास आणखी पैसे द्यावयाचे नसल्याने तिने एसीबीकडे याबाबत तक्रार दाखल केली. एसीबीचे पथकाने सापळा रचला असता, पंचासमक्ष वकील सुमीत गायकवाड याने तक्रारदार तरुणीला व तिच्या मित्राला कोथरुड पोलिसांकडून सोडविण्यासाठी तसेच तक्रारदार याच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल न करण्यासाठी 3 लाख 50 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी 20 हजार रुपये फोन पे द्वारे त्याचे खात्यात मागणी करुन घेतल्यावर पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. याबाबत कोथरुड पोलिस स्टेशन मध्ये आरोपीवर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम सात (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक डॉ.शीतल जानवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक विजयमाला पवार , पोलिस निरीक्षक अतुल भोसले, स.पो.फौज.मुकुंद अयाचित, पो.शि.शिल्पा तुपे, वनिता गोरे, अविनाश चव्हाण, दिपक काकडे यांचे पथकाने सदर कारवाई केली आहे.

COMMENTS