Homeताज्या बातम्यादेश

 ग्रेसगुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचे निकाल रद्द

नीट परीक्षा पुन्हा द्यावी लागणार

नवी दिल्ली ः एनटीएकडून घेण्यात येणारी नीट परीक्षांचे निकाल वादाच्या भोवर्‍यात सापडले असून, याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. गुरूवा

कल्याण आधारवाडी परिसरात दुस:याच्या भांडणात लहान भावाची मध्यस्थी मोठया भावाच्या जिवावर बेतली | LOKNews24
कोरोनाच्या वाढत्या संसर्गांचा उत्पादन क्षेत्राला फटका
भररस्त्यात चाकुने वार करत तरुणाची हत्या.

नवी दिल्ली ः एनटीएकडून घेण्यात येणारी नीट परीक्षांचे निकाल वादाच्या भोवर्‍यात सापडले असून, याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. गुरूवारी झालेल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने गे्रस गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचे निकाल रद्द केले आहेत. त्यामुळे गे्रस गुण मिळालेल्या तब्बल 1 हजार 563 विद्यार्थ्यांची नीट परीक्षा पुन्हा एकदा 23 जून रोजी होणार आहे. नीट निकालानंतर दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, ग्रेस गुण मिळालेल्या 1 हजार 563 विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेतली जाईल. त्याचबरोबर समुपदेशनावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे एनटीएच्या वतीने सांगण्यात आले आहे. नीटच्या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचा देखील आरोप करण्यात येत आहे. एनटीएच्या नीट परीक्षेच्या पावित्र्यावर प्रश्‍न उपस्थित करणारी नवीन तथ्ये समोर आली आहेत. ती सर्वोच्च न्यायालयात मांडली गेली. धक्कादायक म्हणजे नीटची नोंदणी बंद होऊनही एनटीएने एक दिवस पुन्हा नोंदणी सुरू केली होती. याचिकेत असाही दावा केला की, हजारीबाग, झारखंडमधील ज्या केंद्रांवर बिहार पोलिसांनी अनियमिततेचा दावा केला, त्याच केंद्रावरील 8 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण मिळाले. तेलंगणचे अब्दुल्ला मोहंमद फैज व आंध्रचे शेख रोशन मोहिद्दीन यांनी पुराव्यासह म्हटले की एनटीएची भूमिका संशयास्पद आहे. एनटीएकडून घेण्यात आलेल्या नीटपरीक्षेवर अनेक आक्षेप नोंदवण्यात येत असून, याप्रकरणी अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. फिजिक्सवाला अलख पांडे यांच्या वकिलाने याचिका दाखल करून ग्रेस गुण देणे योग्य नसल्याचा आरोप केला होता. त्याच्या याचिकेवर न्यायालयाने एनटीएला नोटीस बजावली आहे. आता या प्रकरणावर 8 जुलै रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. मुलांचे समुपदेशन सुरूच राहणार आहे. आम्ही ते थांबवणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान सांगितले. आमच्या निर्णयात परीक्षा रद्द करण्याच्या मुद्द्याचा समावेश असेल, तर समुपदेशनही आपोआप रद्द होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी करू नये. नीट परीक्षेच्या आयोजनात गैरप्रकार झाल्याचा आरोप करणार्‍या याचिकांवर न्यायालयाने नोटीस बजावली आणि 8 जुलै रोजी येणार्‍या याचिकांशी जोडणी केली आहे. के त्यातील एका याचिकेत फिजिक्सवालाचे सीईओ अलख पांडे यांनी दाखल केलेल्या याचिकेचाही समावेश आहे.न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

ग्रेस गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांकडे दोन पर्याय – ग्रेस गुण दिलेल्या विद्यार्थ्यांना एनटीएने दोन पर्याय दिले आहेत. हे विद्यार्थी पुन्हा परीक्षेला बसू शकतात किंवा त्यांच्या जुन्या गुणांसह समुपदेशनासाठी पुढे जाऊ शकतात. परंतु त्यांच्या स्कोअरकार्डमधून अतिरिक्त गुण काढून टाकले जातील. ज्या उमेदवारांना आपण पुनर्परीक्षेत चांगली कामगिरी करू शकतो, असा आत्मविश्‍वास आहे ते पुनर्परीक्षेला बसण्याचा निर्णय घेऊ शकतात. पुनर्परीक्षेचा निर्णय हा सर्वस्वी विद्यार्थ्यांचा असणार आहे. 23 जून रोजी पुन्हा परीक्षा (1 हजार 563) होईल, त्यानंतर निकाल 30 जूनपूर्वी येऊ शकतो.

COMMENTS