Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधानसभेसाठी रिपाइंने मागितल्या 12 जागा

नागपूर ः विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. महायुतीमध्ये तीन प्रमुख पक्ष असले तरी, मित्र पक्ष

पंजाबमध्ये आप स्वतंत्र लढणार ः केजरीवाल
अधिक गतिमान, प्रशासनासाठी ‘टेक वारी’ उपक्रम मार्गदर्शक  : उपमुख्यमंत्री अजित पवार
प्रा. लक्ष्मण हाके यांची तब्येत बिघडली

नागपूर ः विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. महायुतीमध्ये तीन प्रमुख पक्ष असले तरी, मित्र पक्षांना देखील सन्मानाची वागणूक देण्याची मागणी करण्यात येत असतांना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रिपाइंला विधानसभेसाठी 14 जागा सोडण्याची मागणी केली आहे. नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलतांना आठवले म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीला राज्यात म्हणावे तेवढे यश मिळालेले नाही. आम्ही लोकसभेला 2 जागा मागितल्या होत्या, मात्र मिळाल्या नाहीत. आता विधानसभा निवडणुकीत आम्हाला 12 जागा द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. महाराष्ट्रात आम्ही 18 जागांची यादी केली आहे. त्यापैकी 12 जागा द्याव्यात तसेच विदर्भात किमान 4 जागा पाहिजे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पुढे बोलताना आठवले म्हणाले, माझ्या पक्षासोबत मोठ्या प्रमाणात दलित मतदार आहेत. आम्हाला भाजपच्या कोट्यातून मानू नये, तर भाजप, शिंदे आणि अजित पवारांच्या कोट्यातून 4-4 जागा द्याव्या, म्हणजे आम्हाला 12 जागा मिळतील. येणार्‍या एनडीए सरकारमध्ये आम्हाला मंत्री पद द्यावे, तसेच 2 महामंडळ द्यावे, अशी मागणी आठवले यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चतुर नेते आहेत. ते आमची ताकद ओळखतील, असा विश्‍वासही त्यांनी दाखवला आहे.

COMMENTS